CAA Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'शांततेच्या आवाहना'च्या ट्वीटवर अभिनेत्री रेणूका शहाणे कडून टीका; 'तुमची IT सेल खरी तुकडे तुकडे गँग' असल्याचं ट्वीट

पंतप्रधानांच्या या ट्वीटला रिप्लाय करताना रेणूका शहाणे यांनी भाजपा पक्षावर अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे.

Renuka Shahne | Photo Credits: File Photo

नागरिकत्व कायद्याविरूद्ध ईशान्य भारतातून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभरात उमटायला सुरूवात झाली आहे. दरम्यान यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे (Renuka Shahane) यांनी देखील थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ट्वीटला रिप्लाय देताना, 'भाजपा आयटी सेल खरी तुकडे तुकडे गॅंग आहे' असं म्हटलं आहे. देशाभरातील तणावाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपलं बंधुत्त्व कायम ठेवत शांततेचे आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या या ट्वीटला रिप्लाय करताना रेणूका शहाणे यांनी भाजपा पक्षावर अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे.

रेणूका शहाणे यांनी तुमच्या आयटीसेलच्या माध्यमातून अफवा, चूकीच्या बातम्या आणि बंधुत्त्व, शांततेला तडा जाणारी ट्वीट्स केली जात आहेत. तुमची आयटी सेल 'तुकडे तुकडे गॅंग' असल्याचं म्हणत रेणूका शहाणे यांनी भाजपावर टीका केली आहे. Citizenship Amendment Bill सरकारची कसोटी पाहणारं नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक नेमकंं आहे काय?  

पहा रेणूका शहाणे यांचं काय मत आहे?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे  बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात 6 वर्षे वास्तव्य केल्यास सोबत त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसली, तरी थेट भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सध्या या कायद्याविरूद्ध ईशान्य भारतातून प्रामुख्याने विरोध केला जात आहे.