सिंगिगच्या कारणामुळे गर्लफ्रेंडने केले होते ब्रेकअप, रॅपर बादशहा याचा धक्कादाक खुलासा
प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर म्हणून ओळख झालेल्या बादशहा (Badshah) याने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाची छाप पाडली आहे. मात्र बाहशहा याचा रॅपर पर्यंतचा आजवरचा प्रवास अधिक खडतर होता. बाहशहा याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीबाबतच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर म्हणून ओळख झालेल्या बादशहा (Badshah) याने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाची छाप पाडली आहे. मात्र बाहशहा याचा रॅपर पर्यंतचा आजवरचा प्रवास अधिक खडतर होता. बाहशहा याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीबाबतच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने असे म्हटले आहे की, मला यश हे सहजपणे मिळाले नाही. त्यासाठी मी अथांग प्रयत्न आणि कष्ट केले. या दरम्यान सिंगिगच्या कारणामुळे गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्याचा धक्कादायक खुलासा बादशहा याने केला आहे.
बाहशहा याने त्याच्या आयुष्यातील स्ट्रगलकडे एका सकारात्मक दृष्टीने पाहिले असून त्याला करिअरमध्ये यश मिळाल्याचे अधिक कौतुक आहे. पिंकविला यांना दिलेल्या मुलाखतीत बादशहा याने असे सांगितले आहे की, स्ट्रगल करताना मी पैशांशिवाय प्रवास केला होता. कधीकधी जमीनीवर सुद्धा झोपून दिवस काढले आहेत. मात्र या सर्व गोष्टींमध्ये कोणत्याच गोष्टीचे मी दुख बाळगले नसून त्यामध्ये आनंद शोधला आहे. एवढेच नाही तर स्ट्रगल मुळे मी संयम पाळायला शिकलो असल्याची भावना बादशहा याने व्यक्त केली आहे.(Aparajitha Ayodhya: राम मंदिर प्रकरणावर कंगना रनौत बनवणार चित्रपट; पुढील वर्षापासून शुटींग सुरु)
View this post on Instagram
Having Parle-G and Little Hearts “biskut” in the clouds. Pahaad zindagi hain.
A post shared by BADSHAH (@badboyshah) on
तसेच रॅपरच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी घरातील मंडळींना बादशहा याने पाहिलेले स्वप्न खटकले होते. तसेच माझे आयुष्य या रॅपरच्या करिअरमध्ये खराब होईल अशी भीती घरातल्यांना होती. मात्र सगळ्या गोष्टी सहन करत जवळजवळ पाच वर्ष स्ट्रगल केल्यानंर घरातील मंडळींना बादशहा याच्या कामाबाबत समजू लागले होते. या सर्व घडामोडींमध्ये आयुष्यातून गर्लफ्रेंड सुद्धा निघून गेली. कारण तिला असे वाटायचे रॅपरचे करिअर हे योग्य नाही आहे. त्यानंतर बाहशहा याने स्वत:ला या धक्क्यामधून बाहेर काढत आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित केले. बादशहा याचे नवे गाणे अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा गुड न्यूज मध्ये झळकणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)