अभिनेता राणा दग्गुबाती च्या होणा-या बायकोने मास्क घालून केले झकास प्री-वेडिंग फोटोशूट (See Pics)
या फोटोत मिहीका एक पारंपारिक वेषात दिसत आहे. यात ती छान नटली असून खबरदारी म्हणून तिने मास्क घालून फोटोशूट केले आहे. यातही ती खूप सुंदर दिसत आहे.
ब्लॉगबस्टर चित्रपट 'बाहुबली' भल्लाल देव या पात्रातून लोकांच्या कौतुकाची थाप मिळवणारा साऊथचा अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. राणा लवकरच मिहीका बजाज (Mihika Bajaj) हिच्यासोबत विवाह करणार आहे. कोरोना व्हायरसच्या सावटामुळे अनेक कलाकारांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. मात्र राणाने दग्गुबाती आणि मिहीकाने असे काही न करता अगदी साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन लग्न करायचे ठरवले आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन राणाची होणारी बायको मिहीकाने आपल्या लेहंग्यावर मॅचिंग मास्क घालून झकास प्री वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) केले आहे.
हे फोटोज सध्या सोशल प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत मिहीका एक पारंपारिक वेषात दिसत आहे. यात ती छान नटली असून खबरदारी म्हणून तिने मास्क घालून फोटोशूट केले आहे. यातही ती खूप सुंदर दिसत आहे. Rana Daggubati-Miheeka Bajaj Engagement: बाहुबली फेम राणा दग्गुबाती ने And it’s official!! म्हणत शेअर केले गर्लफ्रेंड मिहिका बजाज सोबत साखरपुड्याचे खास फोटो
पाहा फोटोज:
तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. या फोटोंवर लोकांचे प्रचंड कमेंट्स येत आहेत.
राणा आणि मिहीका यांचा रोका सोहळ्याचे फोटोज समोर आल्यानंतर आता त्यांचे प्री-वेडिंगचे फोटो समोर आले आहेत. राणा आणि मिहीका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.