अभिनेत्री राखी सावंत हिने 28 जुलैला एका NRI व्यक्सीसोबत गुप्तपणे विवाह केलाय? वाचा सविस्तर

आपल्या अभिनयापेक्षा बोलण्यातून सर्वांमध्ये चर्चेत असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या बद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की, राखी हिने 28 जुलैला एका NRI व्यक्तीसोबत गुप्तपणे विवाह केला आहे.

अभिनेत्री राखी सावंत हिने 28 जुलैला एका NRI व्यक्सीसोबत गुप्तपणे विवाह केलाय? वाचा सविस्तर
राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

आपल्या अभिनयापेक्षा बोलण्यातून सर्वांमध्ये चर्चेत असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या बद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की, राखी हिने 28 जुलैला एका NRI व्यक्तीसोबत गुप्तपणे विवाह केला आहे. या दोघांचे लग्न मुंबईतील JW मॅरियट या पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडले असून त्यावेळी फक्त जेमतेम 4-5 जण तेथे उपस्थित होते. राखीला ही गोष्ट सर्वांसमोर उघड करायची नसल्यामुळेच तिने गुप्तपणे लग्न केले आहे.

स्पॉटबॉय यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड ड्रामा क्विन राखी हिने काल जेडब्लू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले आहे. लग्नावेळी घरातील मोजक्याच व्यक्ती उपस्थित असून ते गुप्तपणे पार पडले आहे. लग्नाची गोष्ट कोणाला कळू नये यासाठी त्यांनी संपूर्ण हॉलचे बुकिंग केले नाही. तर हॉटेलमधील एका रुममध्ये या दोघांचा विवाह पार पडला आहे. परंतु राखीने लग्न केलेल्या NRI व्यक्तीचे नाव किंवा त्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियात राखी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर काही महिन्यांपूर्वी राखी दीपक कलाल याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची खबरसुद्धा जोरदार रंगली होती. मात्र नंतर दीपक सोबत लग्न करणार नसल्याचे राखीने स्पष्ट केले होते.(Hot Pics: जान्हवी कपूर हिचा स्पोर्ट्स ब्रा मधील हॉट जीम लूक व्हायरल)

तर पहिल्या वेळेस राखी हिचा 2004 मधील परदेसिया गाण्याच्या व्हिडिओ हिट झाल्यानंतर तिने असरफ या तरुणासोबत गुप्तपणे लग्न केले होते. या दोघांचे नाते फक्त 2-3 महिने टिकले. त्यानंतर राखीने टेलिव्हिजनवर 'राखी का स्वयंवर' नावाच्या कार्यक्रमातून सुद्धा लग्न केले पण ते सुद्धा जास्त काळ टिकले नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2019 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).