सोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स आणि करणार आशिकी खास

सोनू निगम यांनी ‘रकम्मा’ हे गाणे गायले आहे. इतकेच नव्हे तर, सोनू निगम यांनी या चित्रपटातील सगळी गाणी गायली आहेत आणि या चित्रपटाच्या गाण्यांना सचिन पिळगांवकर यांनी संगीत दिले आहे

सोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स आणि करणार आशिकी खास
अशी ही आशिकी (file image)

प्रेम, कन्फेशन, इमोशन आणि ‘अशी ही आशिकी’. प्रेमात पडणे ते आशिकी करणे हा संपूर्ण प्रवास निराळाच असतो. हाच निराळा प्रवास अनुभवण्यासाठी आणि नवीन वर्षात आशिकी करायला भाग पाडण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘अशी ही आशिकी’. गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर रिलीझ झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवीन विषय, नवीन जोडी, चित्रपटाचे कॅची नाव आणि प्रेक्षकांच्या भेटीला आलेला टीझर आदी गोष्टी चित्रपटाविषयीची आतुरता वाढवत आहेत. इतकेच नव्हे तर, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन्स डे ऐवजी AHA Day साजरा होणार, म्हणजे नेमके काय हॅपनिंग पाहायला मिळणार याविषयीदेखील कुतुहल अनेकांच्या मनात आहे.

कॉन्फिडंट, फ्रि-मांइडेड असलेले स्वयम आणि अमरजा, या कपलच्या आशिकीची जर्नी जितकी चित्रपटातून फुलणार आहे तितकीच त्यांची लव्हस्टोरी गाण्यांतूनही तितकीच फुलणार आहे. प्रेमात जस-जसे अनेक टप्पे पार पाडावे लागतात, जसे की पहिली भेट, पहिली आठवण वैगरे वैगरे... तसेच काहीसे या प्रेमातपण होणार आहे. स्वयम आणि अमरजाच्या आशिकीची थोडीशी हिंट देण्यासाठी नुकतेच या चित्रपटातील ‘रकम्मा’ हे गाणे डिजीटल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे.

‘रकम्मा’ या गाण्यातून आपल्याला या गोष्टीची कल्पना येते की, स्वयम निकम्मा होऊन रकम्माला शोधतोय. पण अमरजच्या प्रेमात असलेला स्वयम अचानकपणे रकम्माला का शोधतोय आणि मुळात कोण आहे ही रकम्मा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

या गाण्याच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नवीन वर्षात पण सोनू निगमच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे. सोनू निगम यांनी ‘रकम्मा’ हे गाणे गायले आहे. इतकेच नव्हे तर, सोनू निगम यांनी या चित्रपटातील सगळी गाणी गायली आहेत आणि या चित्रपटाच्या गाण्यांना सचिन पिळगांवकर यांनी संगीत दिले आहे. त्यामुळे सोनू निगम यांचा आवाज आणि सचिनजी यांचे संगीत असल्यामुळे ‘अशी ही आशिकी’चा म्युझिकल अल्बम प्रेक्षकांसाठी जणू एक म्युझिकल ट्रिट नक्कीच असेल.

मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनीदेखील ‘अशी ही आशिकी’ची निर्मिती केली असून, वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची लिहिलेली कथा-पटकथा-संवाद आणि स्वयम-अमरजाची आशिकी प्रेक्षकांना 14 फेब्रुवारीला अनुभवयाला मिळेल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2019 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).