पार्ड सिनेमातील न्यूड सिनेमुळे (Nude Scenes) ट्रोल झालेली अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या राधिका आपटेने नुकतीच इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने बिकनीतील नवा आणि सेक्सी लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. राधिकाचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. राधिकाच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याआधीही राधिकाचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यावर एक लेदर जॅकेट घातले आहे. यासोबतच तिने गळ्यात एक गोल्डन नेकलेस घातला आहे. राधिकाचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे देखील वाचा- Mahesh Manjrekar Health Update: महेश मंजरेकर यांच्यावर Urinary Bladder Cancer च्या निदानानंतर शस्त्रक्रिया, आता प्रकृतीत सुधार; रिपोर्ट्स
राधिका आपटेची इंस्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
राधिकाने अनेक सिनेमांमध्ये देखील बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राधिका तिच्या ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यूड सिनेमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली होती. यावेळी सोशल मीडियावर राधिका आपटे आणि तिच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती.
सिनेमा विषयी बोलायचे झाले तर, राधिका ही शेवटी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'रात अकेली है' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. आता तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असल्याचे समजत आहे.