SOPs For Cinema Halls: देशभरात 15 ऑक्टोबर सुरू होणार सिनेमा हॉल; या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक
केंद्र सरकारकडून सिनेमा हॉल सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरिही अद्याप महाराष्ट्रात राज्य सरकारकडून सिनेमा हॉल सुरू करण्याबाबत हिरवा कंदील देण्यात आलेला नाही.
केंद्र सरकारने अनलॉक 5 (Unlock 5) जाहीर करताना देशभरात 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल (Cinema Halls) खुले करण्यासाठी परवानगी दिली आहे. आज त्याबाबत घोषणा करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी विशेष नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये आता केवळ पॅकेज फूड, विशेष जाहिरात आणि 50% क्षमतेसह एक आड एक आसनक्षमता खुली करता येणार आहे. त्यामुळे देशातील सारे सिनेमागृह मालक तयारीला लागले आहेत. दरम्यान मार्च 2020 पासून सर्वत्र सिनेमाहॉल बंद आहेत.
केंद्र सरकारकडून सिनेमा हॉल सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरिही अद्याप महाराष्ट्रात राज्य सरकारकडून सिनेमा हॉल सुरू करण्याबाबत हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी.
केंद्र सरकारची नियमावली
- 50% क्षमतेसह सिनेमा हॉल सुरू होऊ शकतात. मात्र आसन व्यवस्था देताना ग्राहकांना एक आड एक खूर्च्या उपलब्ध करून द्याव्यात.
- सिनेमा हॉलमध्ये मास्कचा वापर करा.
- सिनेमागृहांमध्ये केवळ पॅक्ड फूड दिले जाणार आहे.
- सिनेमागृहात हवा खेळती राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच एसीचं तापमान 24-30 डिग्री ठेवणं बंधनकारक असेल.
- सिनेमागृहात प्रवेशापूर्वी थर्मल स्क्रिनिंग करणं गरजेचे आहे आणि असिम्प्टेमेटिक लोकांना प्रवेश दिला जाईल.
- आरोग्य सेतू अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे.
- बॉक्स ऑफिस सह सिनेमा हॉल मधील अन्य भागांचे नियमित सॅनिटायझेशन करणं आवश्यक आहे.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यासाठी अनलॉक 5 ची नियमावली जाहीर झाली आहे. यामध्ये आता स्विमिंग पूल, सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी आहे तर हळूहळू शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीदेखील विशेष नियमावली लवकरच जाहीर करण्यासाठी केंद्री मंत्री काम करत आहेत.