Prajakta Mali Saree Photos: अभिनेत्री प्राजक्ता माळी चा पारंपारिक ते फ्युजन साड्यांमधील हॉट अंदाज ठरतोय फॅशन गाईड (View Pics)
यात अस्सल पारंपारिक लुक ते अगदी ऑक्सिडाइज दागिन्यांसोबत फ्युजन ट्रेंडी लुक सगळं काही पाहायला मिळतं.
मराठमोळा साज शृंगार या बाबत अलीकडे सर्वांनाच क्रेझ आहे. नऊवारी (Nauvari Saree), सहावारी साडी, नथ, ठुशी, लक्ष्मी हार, मोत्याच्या कुड्या, कोल्हापुरी साज आणि असं बरंच काही फॅशनच्या दुनियेत एव्हरग्रीन हिट आहे. अनेक मराठी अभिनेत्रींनीं आजवर हे लुक करून हजारो / लाखो फॅन्स कमावले आहेत. यात अलीकडे हिट ठरत असणारे नाव म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali). प्राजक्ता अगदी दर दहा दिवसांनी आपला एक तरी साडी नेसलेला फोटो आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट करत असते. यात अस्सल पारंपारिक लुक ते अगदी ऑक्सिडाइज दागिन्यांसोबत फ्युजन ट्रेंडी लुक सगळं काही पाहायला मिळतं. तुम्हाला सुद्धा साड्यांचे वेड असेल तर त्यांचे स्टायलिंग कसे करावे याबाबत टिप्स देणारे प्राजक्ताचे काही फोटो आज आपण पाहणार आहोत. येवला बाजारात आल्या दोन्ही बाजूने नेसता येणा-या पैठणी; नववर्षात साड्यांमध्ये केला मोठा बदल
इरकल साडी आणि खणाची चोळी
Backnot Blouse
ऑक्सिडाइज ज्वेलरी
Bright/ Contrast Colours
Retro Look
Printed Saree
दरम्यान, लॉकडाउन मध्ये आता घरी राहून कंटाळा आला असेल तर असे वेगवेगळे प्रयोग तुम्हीही करू शकता. आपण सगळेघरात अडकून पडलो असलो तरी ऑनलाईन आपल्या जवळच्या लोकांशी जोडलेले आहोतच. घरात फोटोशूट करून तुम्ही हे फोटो पोस्ट करू शकता, आम्हाला सुद्धा तुमच्या काही नवीन टिप्स असतील तर सोशल मीडियावरून आवश्य कळवा.