Poonam Pandey हिचा नवरा सॅम बॉम्बे 'या' कारणामुळे झाला संतप्त, रागात असल्याने भितींवर आपटले अभिनेत्रीचे डोके
कारण पूनम पांडे हिने त्याच्या विरोधात वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा पती सॅम बॉम्बे (Sam Bombay) याला अटक करण्यात आली आहे. कारण पूनम पांडे हिने त्याच्या विरोधात वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पूनम हिने तक्रारीत असे म्हटले की, सॅम याची पहिली बायको अलवीरा सोबत बातचीत करताना वाद झाला. यामुळे सॅम हा संतप्त होत त्याने पूनम हिचे केस पकडत तिचे डोके भिंतीवर आपटले.
पूनम पांडे हिच्या डोळ्यांसह चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. यामुळे तिला अधिक कमी दिसून येत आहे, पूनम पांडे हिच्या या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी सॅम याला अटक केली. वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. याच दरम्यान, पोलिसांच्या द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार पूनम पांडे हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआयच्या मते, याबद्दलची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मात्र पूनम पांडे हिच्या जखमेबद्दल काही माहिती देण्यात आलेली नाही.(Actress Poonam Pandey's Husband Arrested: अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांकडून अटक)
दरम्यान, पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांचा विवाह गेल्या वर्षात 10 डिसेंबरला झाला होता. लग्नापूर्वी हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या 12 दिवसानंतरच या दोघांमध्ये वाद होत मारहाण सुद्धा झाल्याची बातमी समोर आली होती. पूनम पांडे हिने गोव्यात सॅम बॉम्बे विरोधात गुन्हा दाखल केला होता. गोवा पोलिसांनी तेव्हा सुद्धा त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर जामीनावर सोडण्यात आले होते.