Oscars 2019 Nominations List: ऑस्कर 2019 पुरस्कारांची नामांकने, ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ आघाडीवर
यावर्षीदेखील अशीच परिस्थिती आहे, जगभरातील नावाजलेले सिनेमे यावर्षी शर्यतीत आहेत. यंदाच्या नामांकनात ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ या दोन चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत
Oscars 2019 Nominations List: चित्रपट क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारा (Academy Awards) कडे पहिले जाते. अमेरिकेतील ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमी’कडून दरवर्षी चित्रपटविश्वातील विविध श्रेणीमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. जगभरातील कलावंतांसाठी ऑस्करची बाहुली मिळवणे हे स्वप्न असते, मात्र ही स्पर्धा तितकी सोपी नाही. ऑस्करची नामांकने जाहीर झाली की लगेच पुरस्कार कोण जिंकेल याबाबतच्या चर्चांना उधाण येते. जगभरातील चित्रपटांसाठी हा पुरस्कार दिला जातो, त्यामुळे ‘सर्वोत्कृष्ट’ या शब्दाला विशेष रूप प्राप्त झाले असते, म्हणूनच जगभरातील चित्रपटप्रेमी आपापल्या परीने याचे भाकीत मांडत असतात. मात्र इतक्या सुंदर चित्रपटांमधून एका नावाची निवड करणे हे फार कठीण काम आहे. यावर्षीदेखील अशीच परिस्थिती आहे, जगभरातील नावाजलेले सिनेमे यावर्षी शर्यतीत आहेत. यंदाच्या नामांकनात ‘रोमा’ (Roma) आणि ‘द फेव्हरिट’ (The Favourite) या दोन चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.
यंदाचे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे 91 वे वर्ष आहे, जो 24 फेब्रुवारी रोजी (भारतीय वेळेनुसार 25 फेब्रुवारी रोजी) लॉज ऍन्जेलिसमध्ये संपन्न होणार आहे. जगातील तब्बल 225 देशांमध्ये ऑस्करचे थेट प्रक्षेपण होणार आहे. चला पाहूया काय आहेत ऑस्कर 2019 ची नामांकने
> सर्वोत्कृष्ट चित्रपट -
ब्लॅक पँथर
ब्लॅक क्लान्झमन
बोहेमियन राप्सोडी
द फेव्हरिट
ग्रीन बुक
रोमा
अ स्टार इज बॉर्न
व्हाइस
> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -
स्पाइक ली- ब्लॅकक्लान्झमन
पावेल पावलीकोवस्की- कोल्ड वॉर
योरगॉस लँथीमोस- द फेव्हरिट
अल्फान्सो क्वारोन- रोमा
अॅडम मॅक्के- व्हाइस
> सर्वोत्कृष्ट अभिनेता -
ख्रिस्तियन बेल- व्हाइस
ब्रॅडली कुपर- अ स्टार इज बॉर्न
विल्यम डॅफो- अॅट इटर्निटीज गेट
रामी मॅलेक- बोहेमियन राप्सोडी
व्हिगो मॉर्टेन्सन- ग्रीन बुक
> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -
यालित्झा अपॅरिशियो-रोमा
ग्लेन क्लोज- द वाइफ
आॅलिव्हिया कोलमन- द फेव्हरिट
लेडी गागा- अ स्टार इज बॉर्न
मेलिसा मॅकार्थी- कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी?
> सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट -
कॅपरनम (लेबनॉन)
कोल्ड वॉर (पोलंड)
नेव्हर लुक अवे (जर्मनी)
रोमा (मेक्सिको)
म्शॉपलिफ्टर्स (जपान)
> अॅनिमेटेड फीचर फिल्म -
इन्क्रिडेबल्स 2
आयल ऑफ डॉग्स
मिराई
राल्फ ब्रेक्स द इंटरनेट
स्पायडर-मॅन
> सर्वोत्कृष्ट सहअभिनेता -
महेर्शला अली- ग्रीन बुक
अॅडम ड्रायव्हर- ब्लॅकक्लान्झमन
सॅम इलिओट- अ स्टार इन बॉर्न
रिखर्ड ई ग्रांट- कॅन यू एव्हर फरगिव्ह मी?
सॅम रॉकवेल- व्हाइस
> सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री -
अॅमी अॅडम्स- व्हाइस
मरिना डी ताविरा- रोमा
रेगिना किंग- इफ बियल स्ट्रीट कुड टॉक
एमा स्टोन- द फेवरिट
रेचल वेझ- द फेव्हरिट
> सर्वोत्कृष्ट छायाचित्रण -
कोल्ड वॉर (लुकाझ झल)
द फेव्हरिट (रॉबी रायन)
नेव्हर लुक अवे (कॅलेब देस्केनेल)
रोमा (अल्फोंसो क्युरॉन)
अ स्टार इन बॉर्न (मॅथ्यू लिबॅटिक)
> सर्वोत्कृष्ट संकलन –
ब्लॅकक्लान्झमन (बरी अलेक्झांडर ब्राउन)
बोहेमियन राप्सोडी (जॉन ऑटमॅन)
द फेव्हरिट (योरगॉस मेव्ह्रोप्सॅरिडीस)
ग्रीन बुक (पॅट्रिक जे. डॉन विटो)
वाइस (हँक कॉर्विन)
> सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत -
ब्लॅक पँथर (लुडविग गोरान्ससन)
ब्लॅकक्लान्झमन (टेरेन्स ब्लॅन्कार्ड)
इफ बेल स्ट्रीट कुड टॉक (निकोलस ब्रिटेल)
आयल ऑफ डॉग्ज - अलेक्झांडर डेस्प्लेट
मेरी पॉपिन्स रिटर्न्स (मार्क शैमन)
> सर्वोत्कृष्ट गीत -
ऑल द स्टार्स- ब्लॅक पँथर
आइल फाईट- आरबीजी
द प्लेस व्हेअर लॉस्ट थिंग्स गो- मेरी पॉपिन्स रिटर्न्स
शॅलो- अ स्टार इज बॉर्न
व्हेन अ काऊबॉय ट्रेड्स हिज स्पर्स फॉर विंग्स- द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स
> सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा -
द फेव्हरिट (डेबोरा डेव्हिस आणि टोनी मॅकनामेरा)
फर्स्ट रिफॉर्म्ड (पॉल Schrader)
ग्रीन बुक (निक वेल्लेन्गा, ब्रायन क्यूरी आणि पीटर फेरेलली)
रोमा (अल्फोंसो क्युरॉन)
वाइस (अॅडम मॅकके)
याचसोबत अजून दोन कारणांसाठी यावर्षीचा ऑस्कर चर्चेत राहिला आहे, एक तर यावर्षीचा ऑस्कर सोहळा हा सूत्रसंचालकाविनाच पार पडणार आहे. दुसरे म्हणजे यावर्षी ऑस्करमधून चार श्रेणी वगळण्यात आलेल्या होत्या ज्यामध्ये सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटींग, लाइव्ह ऍक्शन शॉर्ट, मेकअप त्याचप्रमाणे हेअर स्टाईलचा समावेश आहे. मात्र जगभरातून झालेल्या टीकेमुळे त्यांना पुन्हा पुरस्कार सोहळ्यांमध्ये स्थान देण्यात आले.