Oscars Award 2019: भारतीय निर्माती Guneet Monga च्या 'Period End of Sentence' ने ऑस्कर पटकावला; सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्ररी म्हणून गौरव
ए.आर. रेहमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुनितच कौतुक केलं आहे.
Academy Awards 2019: अमेरिकेमध्ये 91व्या अकॅडमी पुरस्कार (91st Academy Awards) म्हणजेच ऑस्करला सुरूवात झाली आहे. भारतीय सिनेमाची मजल अजून थेट ऑस्कर पर्यंत पोहचली नसली तरीही भारतामध्ये 'मासिकपाळी' आणि त्याविषयी समाजात असलेल्या समज गैरसमजांवर आधारित 'Period. End of Sentence' ने यंदाच्या ऑस्करमध्ये Best Documentary Short चा पुरस्कार पटकावला आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत दिल्लीच्या स्नेहाने काम केलं आहे. भारताचा खरा 'पॅडमॅन' Arunachalam Muruganathan यांच्या कार्याला गौरवण्यात आलं आहे.
स्नेहा भारतामध्ये ग्रामीण तरूणींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड मिळावेत या उद्देशाने स्वतः कारखाना चालवते. पोलिस होण्याची इच्छा असणार्या स्नेहाचा प्रवास कसा बदलतो. भारतामध्ये अजूनही स्त्रियांच्या आरोग्याबद्दल पुरेशी सजगता नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा महत्त्वाचा आहे.नेटफ्लिक्सवर ही 26 मिनिटांची डॉक्युमेंट्री उपलब्ध आहे. इराण- अमेरिकन चित्रपट निर्माता Rayka Zehtabchi यांनी 'Period. End of Sentence' दिग्दर्शन केलं आहे. मंदाकिनी कक्कर आणि गुनित मोंगा या भारतीय कलाकारांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. ए.आर. रेहमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुनितच कौतुक केलं आहे. Oscars 2019 Live Streaming: भारतामध्ये 91 वे Academy Awards लाईव्ह कसे, कुठे, कधी पहाल?
स्नेहाची टीम ऑस्कर सोहळ्यासाठी अमेरिकेला गेली आहे. ऑस्करमध्ये नामांकन मिळवणं हेच मोठं यश असल्याची भावना काही दिवसांपूर्वी गुनितने बोलून दाखवली होती. आता पुरस्कार पटकावल्यानंतर त्याचा आनंद द्विगुणित झाला असेल नक्की!