Nishikant Kamat Passes away: प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन
निशिकांत कामत यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतून केली होती. मुंबईतील रुईया कॉलेजमधून कामत यांची कारकीर्द बहरत गेली. डोंबिवली फास्ट हा त्यांनी दिग्दर्शित केले त्यांच्या कारकिर्दितील पहिला सिनेमा. कामत यांच्या डोंबिवली फास्ट या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
Nishikant Kamat Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक निशिंकात कामत ((Nishikant Kamat) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथील Asian Institute of Gastroenterology येथे उपचार सुरु होते. त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचेही वृत्त होते. गेल्या चार दिवसांपूसून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या निधनाचे वृत्त ट्विटरद्वारे दिले आहे. निशिकांत कामत यांच्या निधनानंतर (Nishikant Kamat Passes Away) अनेक मान्यवरांनी दुख: व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक मंडळींना धक्का बसला आहे.
निशिकांत कामत यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतून केली होती. मुंबईतील रुईया कॉलेजमधून कामत यांची कारकीर्द बहरत गेली. डोंबिवली फास्ट हा त्यांनी दिग्दर्शित केले त्यांच्या कारकिर्दितील पहिला सिनेमा. कामत यांच्या डोंबिवली फास्ट या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पुढे त्यांनी दृश्यम, मदारी, लै भारी यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण चित्रपट दिले. निशिकांत कामत हे पूर्णपणे मराठमोळे व्यक्तिमत्व होते. (हेही वाचा, Nishikant Kamat Death Rumours: प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक,निधनाच्या अफवा)
निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त Milap Zaveri यांनीही ट्विटरद्वारे दिले होते. मात्र, थोड्या वेळाने आपली चूक दुरुस्त करत त्यांनी कामत हे व्हेंटीलेटरवर असल्याचे म्हटले होते. मिलाप झवेरी हे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आहेत. ते निशिंकात कामत यांचे अत्यंत निटकवर्तीय म्हणून ओळखले जातात. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये मिलाप यांनी म्हटले आहे की, ''निशिकांत कामत यांचे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी आहे. जयहींद महाविद्यालयात झालेल्या नाट्यस्पर्धेत माझ्या पहिल्या नाटकाचा पहिला परिक्षक होता. या नाटकात मला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि लेखक म्हणून गौरविले गौरविण्यात आले होते.
दरम्यान, निशिंकात कामत यांच्या निधनानंतर चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे यांनीही दुख: व्यक्त केले आहे. निशिकांत यांचा सहावास हा एक खास अनुभव असायचा अशी भावना साबळे यांनी व्यक्त केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)