Nilesh Sable New Comedy Show: निलेश साबळे, भाऊ कदम आणि जोडीला ओंकार भोजने; नवा कोरा विनोदी कार्यक्रम लवकरच! घ्या अधिक जाणून
निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा . निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे.
झी मराठी वाहिनीवरून 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेने काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याआधी या कॉमेडी शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती. डॉ. निलेश साबळेने (Dr. Nilesh Sable) शो सोडल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र, आजारपण आणि इतर काही कारणांनी शो सोडला असल्याचे निलेश साबळे यांनी सांगितले होते. आता निलेश साबळे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” हा नवा शो घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा शो 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे. (हेही वाचा - Kushal Badrike Video From CHYD: कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; 'निरोप घेतो आता..' म्हणत 'चला हवा येऊ द्या' ला अलविदा ( Watch Video))
डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. तसेच भाऊ कदम यांचा देखील आपला वेगळाच फॅन बेस आहे. निलेश साबळे सोबत या कार्यक्रमात भाऊ कदम देखील झळकणार आहे. या सोबतच महाराष्ट्राची हास्यजत्रेद्वारे घराघरात पोहचलेला अभिनेता ओंकार भोजने हा देखील प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे.
पाहा पोस्ट -
डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. चला हवा येऊ द्या नंतर आता ‘‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो देखील प्रेक्षकांना लोटपोट हसवेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.