Netflix, Amazon Prime सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सवर येणार सेन्सॉरशिप? प्रसारण मंत्रालय लवकरच घेणार एक कार्यशाळा
परंतु आता मात्र या Apps ने देखील सेन्सॉरशिपची कात्री लवकरच लागण्याची शक्यता आहे.
Netflix, Amazon Prime, Hotstar आणि Voot सारखे अनेक OTT प्लॅटफॉर्म्स सध्या मनोरंजनाचा एक उत्तम पर्याय ठरत आहे. टेलिव्हिजनचा मोठा प्रेक्षक वर्ग सध्या या वेब कन्टेन्टकडेच जास्त आकर्षित झालेला दिसून येतो. परंतु हीच ऑनलाईन Apps जितकी प्रसिद्ध आहेत तितकंच त्यावरील कन्टेन्ट वादग्रस्त देखील आहे.
या Apps वरील कन्टेन्टवर आजपर्यंत कोणताही निर्बंध किंवा सेन्सॉरशिप लावण्यात आली नव्हती. परंतु आता मात्र या Apps ने देखील सेन्सॉरशिपची कात्री लवकरच लागण्याची शक्यता आहे.
OTT माध्यमांवरील कन्टेन्ट संदर्भात येणाऱ्या तक्रारी पाहून प्रसारण मंत्रालयाने लवकरच या संबंधित एक कार्यशाळा घ्यायचे ठरवले आहे.
ही कार्यशाळा 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली असून यावेळी माहिती व प्रसारण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यतः ही कार्यशाळा घेण्याची कल्पना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची होती परंतु ते निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत.
अशाच प्रकारची एक कार्यशाळा यापूर्वीही मंत्री स्मृती इराणी यांनी आयोजित केली होती. परंतु त्या दरम्यान या मुद्द्यांवर कोणताही मार्ग सापडला नसल्याने ही नवी कार्यशाळा आयोजित केली आहे.