Navra Majha Navsacha 2: यंदा गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने, तब्बल 19 वर्षानंतर 'नवरा माझा नवसाचा' सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेट जाहीर

त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची बरीच उत्सुकता लागून राहिली होती. आता चित्रपटाच्या टिमकडून रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Photo Credit- Instagram

Navra Maza Navsacha 2 : मागील अनेक महिन्यांपासून मराठी प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कॉमेडी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. त्या सर्वांची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण नवरा माझा नवासाचा (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. प्रेक्षकांनीही नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा पहिला भाग अक्षरश: डोक्यावर घेतला होता. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची बरीच उत्सुकता लागून राहिली होती. हा भाग पहिल्या भागाएवढाच कॉमेडी असेल का? चित्रपटात सहभागी झालेले नवे कलाकार त्यांच्या पात्रांना योग्य न्याय देतील का? असे प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केले जात होते. (हेही वाचा:Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी होस्ट आणि संभाव्य स्पर्धक घ्या जाणून )

नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. येत्या 20 सप्टेंबर रोजी नवरा माझा नवासाचा 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा एक टीझर रिलीज करण्यात आला. नवरा माझा नवासाचा 2 मध्ये अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सुप्रिया पिळगांवकर ही मंडळी दिसणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा हा प्रवास एसटीबसने होणार नसून कोकण रेल्वेने होणार आहे. (हेही वाचा: Marathi Movie Alyad Palyad: गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा; पहिल्या भागाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई)

बस प्रवासात अशोक सराफ जसे कंडक्चरच्या भूमीकेत होते. तसेच ते आता रेल्वेमध्ये टीसीच्या भूमीकेत असणार आहेत. त्यामुळे येत्या 20 सप्टेंबरपासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहात येणार आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ultra_Marathi Buzz (@ultra_marathibuzz)

एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif