#womensupportingwomen कॅम्पेनला पाठिंबा दर्शवत पॉर्न स्टार Mia Khalifa हिने शेअर केला Black and White बोल्ड फोटो
मिया खलिफा सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असून ती नवनवे अपडेट्स आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
प्रसिद्ध पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. मिया खलिफा सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असून ती नवनवे अपडेट्स आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. आता मिया खलिफा हिचा एक नवा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात मिया खलिफा हिचा बॅकलेस हॉटनेस पाहायला मिळत आहे. 'women supporting women' ला पाठिंबा दर्शवण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) फोटो टाकण्याचे चॅलेंज सध्या ट्रेंडमध्ये आहे. ते स्वीकारुन मिया हिने हा खास फोटो शेअर केला आहे.
ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मी हे चॅलेंज स्वीकारत आहे. गेल्या वेळेस मी जेव्हा माझ्या मित्रांना इंस्टाग्राम मुव्हमेंटमध्ये चॅलेंज करण्यास टॅग केले होते. तेव्हा त्यांनी मला इन्गोर केले होते. म्हणून यावेळी या चॅलेंज कडे दुर्लक्ष करु नका असे तिने आपल्या मित्रांना सांगितले आहे." यासोबतच तिने तिच्या 7 फ्रेंड्सना या हे चॅलेंज स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. (मिया खलिफा हिला सतावतेय Abs चिंता, फिटनेस पोस्ट पाहून चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया)
मिया खलिफा पोस्ट:
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे कॅम्पेन ट्रेंड होत असतात. सध्या #womensupportingwomen मध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी होत आहेत. दरम्यान, विविध फोटोज आणि व्हिडिओजमधून मिया खलिफा आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवते. तिचे वर्क आऊट व्हिडिओज तर सोशल मीडियात फार हिट आहेत. यापूर्वी तिने Abs दाखवणारा एक फोटो शेअर केला होता.