अरुण गवळी याची कन्या योगिता गवळी हिचा अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी साखरपुडा

दरम्यान, अक्षय आणि योगिता हे दोघे फेब्रुवारी 2020 मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत

Arun Gawli, Arun Gawli, Akshay Waghmare | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

Yogita Gawli Engage Actor Akshay Waghmare: अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) याच्यासोबत गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli) याची कन्या योगिता गवळी (Yogita Gawli) हिचा साखरपुडा झाला आहे. जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत पुणे येथील एका हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अक्षय आणि योगिता हे गेल्या पाचवर्षांपासून एकमेसांना ओळखत होते. त्यांच्यात चांगली मैत्रिही होती. परिणामी दोघांनी विवाहबद्ध व्हावा असा सल्ला उभयतांना त्यांच्या कुटुंबीयांनी दिला होता.

दरम्यान, विविध प्रसारमाध्यमांनी पुणे टाइम्सचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. पुणे टाइम्सला बोलताना अक्षय वाघमारे याने सांगितले की, 'मी आणि येगिता गेली पाचवर्षे एकमेकांना ओळखतो. आमच्यात मैत्री होती. आमची मैत्री कुटुंबीयांनाही माहिती होती. त्यामुळे आम्ही दोघांनी विवाहबद्ध व्हावे असा सल्ला आम्हा दोघांनाही आमच्या कुटुंबीयांनी दिला होता. या सल्ल्यानंतर आम्ही विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. घेतलेल्या निर्णयाबाबत आम्ही आनंदी आहोत', असेही वाघमारे याने या प्रतिक्रियेत म्हटले आहे. (हेही वाचा, शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेप)

 

View this post on Instagram

 

अभिनेते अक्षय वाघमारे यांचा साखरपुडा सोहळा संपन्न.... अभिनंदन @akshayswaghmare @cupidsillyshell #Congratulations #AkshayWaghmare #EngageMent #Engage

A post shared by Celebrity Promoters (@celebrity_promoters) on

दरम्यान, अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या साखरपुडा कार्यक्रमाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे आदी कलाकार उपस्थित होते असे समजते. दरम्यान, अक्षय आणि योगिता हे दोघे फेब्रुवारी 2020 मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’अशा काही मराठी चित्रपटांमध्ये अक्षय वाघमारे याने अभिनय केला आहे.