Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; राज ठाकरेंसह राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, साजिद नाडियादवाला आदी मान्यवरांनी लावली हजेरी; पहा व्हिडिओ
या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने सिनेप्रेमींची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' (Yek Number) हा मराठी चित्रपट 10 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर बुधवारी 25 सप्टेंबर रोजी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) अभिनेता आमिर खान (Aamir Khan), चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani), आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker), साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala), वर्धा नाडियादवाला आणि साजिद खान यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने सिनेप्रेमींची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. चित्रपटाची कथा तेजस्विनी पंडित आणि धैर्य घोलप यांनी लिहिली आहे. त्याचवेळी विनायक पुरुषोत्तम, मयुरेश जोशी आणि अरविंद जगताप यांनी मिळून त्याची पटकथाही लिहिली आहे. अजय आणि अतुल यांनी त्यांच्या अप्रतिम संगीताने चित्रपटाला अजूनच खास बनवलं आहे. अरविंद जगताप आणि विनायक पुरुषोत्तम यांनी चित्रपटातील संवाद लिहिले आहेत. (हेही वाचा -Navra Maza Navsacha 2 Box Office Collection: 'नवरा माझा नवसाचा 2' ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद; वीकेंडला केली 7.84 कोटींची कमाई)
या चित्रपटाचे कौतुक करताना दिग्दर्शक साजिद खान म्हणाले, मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला वाटले की हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात खूप लोकप्रिय होईल. हा खूप वेगळा चित्रपट आहे. तरुणाईला तसेच प्रत्येक सामान्य व्यक्तीला हा चित्रपट आवडेल. (हेही वाचा -Phullwanti Teaser Out: प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर रिलीज; पहा व्हिडिओ)
'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, पहा व्हिडिओ -
दरम्यान, साजिद नाडियादवाला यांनी सांगितले की, माझे कुटुंब 74 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. या राज्याने मला खूप काही दिले. मला खूप बरे वाटते की आमच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 75 व्या वर्षी आम्ही महाराष्ट्राला काहीतरी परत देण्यास सक्षम आहोत. यावेळी राजकुमार हिरानी यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमात आमिर खानने सर्व कलाकारांसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमला दिल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)