Veteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

‘अमृतवेल’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले. शिवाय त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Saroj Sukhtankar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विविध मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन (Actress Saroj Sukhtankar Passes Away झाले आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही त्यांनी अभिनय केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात रुई या गावी जन्मलेल्या सरोज सुखटणकर (Actress Saroj Sukhtankar) यांनी प्रदीर्घ काळ अभिनय क्षेत्रात काम केले. त्यांच्या मागे भाऊ, ३ पुतणे असा परिवार आहे.

अभिनेत्री सरोज सुखटणकर यांनी अभिनय, नाटक आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे केले. त्यांनी आपल्या एकूण कारकीर्दीत सुमारे 50 पेक्षाही अधिक नाटकांतून अभिनय केला. विविध भूमिका निभावल्या. सरोज सुखटणकर अभिनीत 'नर्तकी' या नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या नाटकाचे तब्बल 300 हून अधिक प्रयोग झाले. यासोबतच ‘वादळवेल‘ या नाटकात सरोज सुखटणकर यांनी केलेला अभिनय रसिसांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिला. (हेही वाचा, Ashalata Wabgaonkar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

दरम्यान, सरोज सुखटणकर यांनी दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव सदाशिव’ चित्रपटासह ‘जोतिबाचा नवसट, टदे दणादणट, 'लेक चालली सासरला' यांसारख्या चित्रपटांतूनही अभिनय केला. सरोज सुखटणकर यांच्या चित्रपट अभिनय कारकिर्दीतील ‘धनगरवाडा’ हा चित्रपट शेवटचा ठरला. ‘अमृतवेल’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले. शिवाय त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.