Avinash Kharshikar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे ठाणे येथे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी एक्झिट

'बंदिवान मी या संसारी' या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटातून त्यांनी आपल्या सिने अभिनयास सुरुवात केली.

Avinash Kharshikar | (Photo Credits: Facebook)

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन ( Avinash Kharshikar Passes Away) झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून अविशनाश खर्शीकर (Avinash Kharshikar) यांची प्रकृती खालावली होती. अखेर ठाणे (Thane) येथील राहत्या घरी त्यांनी अखेराचा श्वास घेतला. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरु होते. 'जसा बाप तशी पोरं', 'आधार', 'आई थोर तुझे उपकार', 'माझा नवरा तुझी बायको', 'चालू नवरा भोळी बायको', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'घायाळ', 'लपवाछपवी', 'माफीचा साक्षीदार' यांसारख्या चित्रपटांतून अविनाश खर्शिकर घराघरात पोहोचले.

अविनाश खर्शिकर यांचे गाजलेले चित्रपट

जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार (हेही वाचा, Pushpa Bhave Passes Away: नाट्य समीक्षेतील तारा निखळला; विचारवंत, प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे निधन)

अविनाश खर्शिकर यांचे गाजलेली नाटके

तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन

अविशान खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अभिनयाची मुशाफिरी केली. 'बंदिवान मी या संसारी' या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटातून त्यांनी आपल्या सिने अभिनयास सुरुवात केली.