Video : 'माधुरी' सिनेमातून उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठीत पाऊल
अलिकडेच सोशल मीडियाद्वारे तिने तिच्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली.
अलिकडच्या काळात मराठी सिनेमाने मोठी भरारी घेतली आहे. आता मराठी सिनेमाचे कौतुक बॉलिवूडकरांनाही वाटत आहे. कथा, कलाकार, अभिनयाचे कौशल्य यांसारख्या अनेक गोष्टींना याचे श्रेय आहे.
मराठी सिनेमाचे प्रभुत्व इतके वाढले आहे की, आता मराठी सिनेमांचे रिमेक बॉलिवूडमध्ये बनत आहेत. इतकंच नाही तर बॉलिवूडचे कलाकारही मराठीत काम करण्यासाठी सरसावत आहेत. धक धक गर्ल माधुरीनंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही पुन्हा एकदा मराठीत येण्यासाठी सज्ज झाली आहे. अलिकडेच सोशल मीडियाद्वारे तिने तिच्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली. माधुरी सिनेमातून उर्मिला मातोंडकर लवरकच रसिकांच्या भेटीला येणार आहे.उर्मिला मातोंडकरचे पती आणि 'मुंबापुरी प्रॉडक्शन'चे मोहसिन अख्तर मीर यांनी 'माधुरी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
पण सिनेमाची कथा, उर्मिलाची भूमिका याबद्दलची उत्सुकता ताणून ठेवा. कारण ही माहिती अद्यापही गुलदस्तातच आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले असून हा सिनेमा 30 नोव्हेंबर 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.