Maharashtra State Film Award Ceremony: 21 ऑगस्टला वरळीच्या Dome SVP Stadium मध्ये पार पडणार 'महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा'

यंदा पहिल्यांदाच राज्य सरकार 58 व्या आणि 59 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार एकाच वेळी प्रदान करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, यांना त्यांच्या रुपेरी पडद्यावरील अविस्मरणीय योगदानाबद्दल चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Maharashtra State Film Award

Maharashtra State Film Award Ceremony: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत मानाचा समजला जाणारा 'महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा' (Maharashtra State Film Award Ceremony) 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी वरळीतील (Worli) डोम एसव्हीपी स्टेडियम (Dome SVP Stadium) येथे पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा मराठी चित्रपट उद्योगाच्या चैतन्यशीलतेचे प्रतीक आहे. या वर्षी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच राज्य सरकार 58 व्या आणि 59 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार एकाच वेळी प्रदान करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, यांना त्यांच्या रुपेरी पडद्यावरील अविस्मरणीय योगदानाबद्दल चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यांच्यासोबतच तेजस्वी आणि चिरस्थायी प्रतिभेचा समानार्थी बनलेल्या आशा पारेख यांना स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  (हेही वाचा - स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री Asha Parekh यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार Shivaji Satam यांना जाहीर)

याशिवाय, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Maharashtra State Marathi Film Awards: सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केले 58 आणि 59 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकने, जाणून घ्या यादी)

या पुरस्कार सोहोळ्याला राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, इम्रान प्रतापगढी, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, विधान परिषद सदस्य सचिन अहिर, विधानपरिषद सदस्य भाई जगताप, विधान परिषद सदस्य सुनिल शिंदे, विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय, आमदार कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, आमदार अजय चौधरी, आमदार आर. तमिल सेल्वन, आमदार आदित्य ठाकरे, आमदार यामिनी जाधव उपस्थित रहाणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now