Tejaswini Pandit ने वाढदिवसा दिवशी आपल्या चाहत्यांना दिली आनंदाची बातमी! ‘क्रिएटीव्ह वाईब’च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात करणार पदार्पण

तेजस्विनी ‘क्रिएटीव्ह वाईब' (Creavtive Vibe) च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत असून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे.

Tejaswini Pandit (Photo Credits: Instagram)

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिचा आज वाढदिवस. आपल्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी पंडितने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. मी सिंधुताई सपकाळ, ये रे ये रे पैसा, तू ही रे, देवा यासांरखे अनेक हिट्स चित्रपट देणारी त्याचबरोबर अनेक मालिकांतूनही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत उत्तम उद्योजिका देखील आहे. तेजस्विनी पंडितने अभिज्ञा भावे सोबत मिळून 'तेजाज्ञा' या फॅशन ब्रँडची सुरुवात केली. त्यापाठोपाठ तेजस्विनी आता निर्मिती क्षेत्रातही आपले नशीब आजमावणार आहे. तेजस्विनी ‘क्रिएटीव्ह वाईब' (Creative Vibe) च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत असून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे.

तेजस्विनीचा मित्र संतोष खेर याच्यासोबत भागीदारीत सुरु केलेले 'क्रिएटीव्ह वाईब' मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही लवकरच उतरणार आहे. संतोष खेर हे दुबईस्थित व्यावसायिक असून त्यांनाही कलेची प्रचंड आवड आहे. कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ही भागीदारी केली आहे.हेदेखील वाचा- Dithee Movie: सुमित्रा भावे दिग्दर्शित शेवटचा सिनेमा 'दिठी' 21 मेला होणार रिलीज; SonyLIV वर पहा चित्रपट

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

'क्रिएटीव्ह वाईब' अंतर्गत सिनेमा, सिरीज, शोज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी 'क्रिएटिव्ह वाईब'चा पहिलाच प्रोजेक्ट एक मराठी वेब शो असून तो 'प्लॅनेट मराठी'सोबत केला जाणार आहे. या शोबाबतच्या अनेक गोष्टी सध्या तरी गुलदस्त्यात असल्या तरी प्रेक्षकांसाठी हा शो म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif