AB Aani CD चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचा अनुभव शेअर करणारी सुबोध भावे ची खास पोस्ट

नुकतेच त्याचे शुटिंग पार पडले. हा अनुभव सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.

Subodh Bhave (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन लवकरच ‘AB आणि CD’ या मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूडच्या शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते. मराठी कलाकार सुबोध भावे याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. आगामी ‘AB आणि CD’ या सिनेमात सुबोध भावे याला बिग बींसोबत काम करणार आहेत. नुकतेच त्याचे शुटिंग पार पडले. हा अनुभव सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.

सुबोध भावेची पोस्ट

‘निर्विवादपणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्याबरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं, कसं वागावं, कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीमचे मनपूर्वक आभार,’ असे लिहित सुबोध भावेने खास फोटो शेअर केला आहे.

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, सुबोध भावेसोबतच विक्रम गोखले, सायली संजीव, अक्षय टंकसाळे खास भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यामध्ये विक्रम गोखले यांच्या मित्राची भूमिका साकारणार आहे.