Vijeta Movie Poster: खेळाची पार्श्वभूमी असलेल्या 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, सुबोध भावे दिसणार महत्त्वपुर्ण भूमिकेत

या चित्रपटाचे नाव 'विजेता' असून नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Vijeta Poster (Photo Credits: Twitter)

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या अभिनेत्याची सर्वत्र हवा आहे त्या सुप्रसिदध अभिनेत्याचा सुबोध भावे चा एक नवा सिनेमा येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'विजेता' असून नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूडमधले नामांकित दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्ट्स' ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. गोवा येथे सुरु असलेल्या मराठी चित्रपट महोत्सवात या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण गोव्याचे सांस्कृतिक आणि कला मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष घई यांनी ट्विटरच्या माध्यमातुन या प्रसंगाचे काही फोटो शेअर केले आहेत.

सुभाष घईं नी याआधी 'सनई चौघडे', 'वळू' आणि 'समिता' या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. विजेता हा सिनेमा देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे ते सांगतायत. खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे हे लक्षात येतय.

हेही वाचा- ‘तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिकेतील 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट

येत्या ऑगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून 24 जानेवारी 2022 साली तो प्रदर्शित करण्याचा सुभाष घई यांचा विचार आहे. या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक अमोल शेटगे तर निर्माते राहुल पुरी आहेत. चित्रपटाचे संगीत रोहन रोहन यांचे आहे.