मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या साखरपुड्याला झाले 6 महिने पूर्ण; कुणाल बेनोडेकरला होकार दिल्याचा एक Romantic फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन व्यक्त केला आनंद
कुणाल बेनोडेकर तिचा हात पकडून तिला प्रपोज करतानाचा हा क्युट फोटो आहे. दुबईच्या वाळवंटात हे फोटोशूट करण्यात आले आहे असे तरी या फोटोवरुन दिसत आहे.
मराठी सिनेसृष्टीची अप्सरा, हिरकणी फेम सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या साखरपुड्याच्या (Engagement) बातमीने तिच्या अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला तर काही तरुणांच्या हृदयाचे तुकडे झाले. सोनालीने 18 मे ला आपल्या वाढदिवसादिवशी इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये (Dubai) साखरपुडा करून घेतला. तिच्या साखरपुड्याला आज 6 महिने पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनालीने कुणालसोबत एक रोमँटिक फोटो शेअर आपला आनंद व्यक्त केला आहे.
या फोटोमध्ये सोनालीने आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. कुणाल बेनोडेकर तिचा हात पकडून तिला प्रपोज करतानाचा हा क्युट फोटो आहे. दुबईच्या वाळवंटात हे फोटोशूट करण्यात आले आहे असे तरी या फोटोवरुन दिसत आहे.
पाहा फोटो:
"हा तो दिवस आहे ज्या दिवशी मी कुणालला हो बोलले," असे कॅप्शन सोनालीने या फोटोखाली दिले आहे.
कुणाल बेनोडेकर हा दुबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक मधील भागात कुणाल काम करतो. कुणालने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स येथून उच्च शिक्षण घेतले आहे. तर त्यापूर्वी लंडन मध्येच त्याने मर्चंट्स टेलर स्कूल येथून BSC शिक्षण पूर्ण केले होते. तो लंडन मध्ये वास्तव्यास असुन काही वर्षांपासुन कामानिमित्त दुबई येथे असतो. मागील अनेक वर्ष कुणाल आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. अद्याप सोनालीने लग्नाची तारिख किंवा लग्नानंतर शिफ्ट होणार का याविषयी मौन बाळगले आहे.