Sonalee Kulkarni Birthday Special: मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी अभिनयाआधी 'या' क्षेत्रात आहे पदव्युत्तर
यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचा आज वाढदिवस. त्यानंतर सोनालीने अनेक चित्रपट केले. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले.
सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून या भाषेचा ठेहराव दिसतो. तिचा लहान भाऊ अतुल हा देखील चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे. 'धुरळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा हटके ग्लॅमरस लूक सोशल मिडियावर व्हायरल, पाहा फोटोज
सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममता हिची भूमिका केली.तसेच अजय देवगण याच्या 'सिंघम 2' ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला लेटेस्टली मराठी कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा