'Smile Please' चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट, हृद्यांतर नंतर पुन्हा एकदा विक्रम फडणीस-मुक्ता बर्वे एकत्र करणार काम

नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.

Smile Please First Look (Photo Credits: Twitter)

फोटोग्राफर जेव्हा फोटो क्लिक करतो तेव्हा त्याचा पहिला शब्द असतो 'स्माईल प्लिज'. या शब्दाचे आपल्या ख-या आयुष्यात किती महत्व आहे हे पटवून देणारा स्माईल प्लिज हा चित्रपट येत्या 19 जुलै ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. हृद्यांतर या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करणारा बॉलिवूडचा नामांकित फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याचा दिग्दर्शन केलेला हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

घड्याळ्याचे काट्यावर चालणारे मुंबईचे फास्ट लाईफ, रोजचे भांडण-तंटे आणि धकाधकीचे जीवन यामुळे लोकं हसणं विसरून गेले आहेत. हसणे हे आयुष्यातील सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे नव्याने हसत जगायचे कसे असा सुंदर संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अन्य कलाकारांचीही या चित्रपटात विशेष भूमिका आहे.

मुक्ता बर्वे सलग दुस-यांदा विक्रम फडणीस सोबत मराठी चित्रपटात काम करत आहे. याआधी हृद्यांतर या चित्रपटात एकत्र काम केले होते. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याने या चित्रपटाचा मुहूर्त केला होता.

Wedding Cha Shinema Song: ‘वेडिंगचा शिनेमा’ मधील 'उगीचच काय भांडायचंय? गाणं रसिकांच्या भेटीला

मुहूर्त सोहळ्याला आमिषा पटेल, झरीन खान, किआरा अडवाणी, रॉनीत रॉय, श्वेता बच्चन- नंदा याांसारखी बरीच बॉलिवूड मंडळी उपस्थित होती.