Singal Marathi Movie: अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे 'सिंगल' चित्रपटात दिसणार एकत्र
या सोहळ्याला अभिनेता अभिनय बेर्डे, प्रथमेश परब, दिग्दर्शक चेतन चवडा, निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम तसेच संतोष शर्मा, शीतल ढेकळे, रितेश ठक्कर, सुहास गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवून सोहळ्याची रंगत द्विगुणित केली.
अभिनेता प्रथमेश परब (Prathmesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर प्रथमेशच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले तर अभिनयच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. एकत्र कधीही काम न केलेली ही तरुण कलाकारांची जोडगोळी दमदार आणि उत्कंटावर्धक चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे. 'सिंगल' (Singal) असे चित्रपटाचे नाव असून प्रथमेश आणि अभिनय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे येथे गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण करून करण्यात आले. या सोहळ्याला अभिनेता अभिनय बेर्डे, प्रथमेश परब, दिग्दर्शक चेतन चवडा, निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम तसेच संतोष शर्मा, शीतल ढेकळे, रितेश ठक्कर, सुहास गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवून सोहळ्याची रंगत द्विगुणित केली.
प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे 'सिंगल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असल्याचे समोर आले असून चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे. आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व याची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे या तरुण जोडगोळीचा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास लवकरच सज्ज होत आहे. दिग्दर्शक चेतन चवडा दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम निर्मित असून हास्यकल्लोळ सादर करण्यास ते सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन सोहळ्याला हा चित्रपट लवकरच चित्रीकरणास जाणार असल्याचे समोर आले आहे. प्रथमेश आणि अभिनयच्या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोणते कलाकार कल्ला करणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. (हे ही वाचा Pondicherry Marathi movie: आयफोनवर चित्रित झालेला 'पॉंडिचेरी' या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित)
नुकत्याच 'सिंगल' या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन सोहळा पार पडला असून चित्रपटाबाबतची उत्सुकता सिनेरसिकांना लागून राहिली आहे. हा चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार कितपत हास्याच्या जोरावर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.