Sharmishta Raut-Tejas Desai Honeymoon: बॉलिवूड कपल्सपाठोपाठ मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने आपल्या हनिमूनसाठी मालदिव्सला दिली पसंती, See Pics
हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात शर्मिष्ठा आणि तेजस एकमेकांसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे रखडलेली अनेक हिंदी आणि मराठी स्टार्सची लग्न ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाली. त्यात मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishta Raut) हिने अनलॉकच्या टप्प्यात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तेजस देसाईसह (Tejas Desai) 11 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकली. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला. मात्र त्यानंतर कोरोनाचा धोका लक्षात घेता आणि आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे शर्मिष्ठाला आपल्या पतीसह हनिमूनला (Honeymoon) जाता आले नाही. त्यामुळे तिने हे थोडे पुढे ढकलले. मात्र नववर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यातच ती आपल्या पतीसह मालदिव्सला (Maldives) जाऊन पोहोचली आहे. येथे शर्मिष्ठा आणि तेजस आपले हनिमून छान एन्जॉय करताना दिसत आहे.
नुकतेच शर्मिष्ठाने आपल्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात शर्मिष्ठा आणि तेजस एकमेकांसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.
शर्मिष्ठाने छान वन पीस, स्विम स्यूटमधील हॉट आणि ग्लॅमरस फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
शर्मिष्ठाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने मन उधाण वा-याचे, जुळून येती रेशीमगाठी, कुंपण, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श या चित्रपटांतही काम केले आहे.