67th National Film Awards: 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरचा स्टायलिश लूक; 'मिमी'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार

तिच्या ग्लॅमरस पोशाखाने ती चर्चेचा विषय ठरली.

Sai Tamhankar Stylish Look (PC - Instagram)

67th National Film Awards: 2021 च्या सर्वोत्कृष्ट हिंदी भाषेतील चित्रपटांच्या सन्मानार्थ 67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची रात्र खूप छान होती. फिल्मफेअरचा रेड कार्पेट इव्हेंट हा संध्याकाळचा आणखी एक ग्लॅमरस हायलाइट कार्यक्रम ठरला. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड दिग्गज उपस्थित होते. रेड कार्पेटमध्ये सर्व बी-टाउन सेलिब्रिटींच्या सौंदर्याने चार चांद लावले होते. या कार्यक्रमात सेलेबच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये बरेच बदल झाले आहेत. सेलिब्रिटींनी त्यांच्या डिझायनर्संनी तयार केलेले सर्वोत्तम ड्रेस परिधान केले होते.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरच्या स्टायलिश लूककडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिच्या ग्लॅमरस पोशाखाने ती चर्चेचा विषय ठरली. तिने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मंत्रमुग्ध करणारा सोनेरी पट्टेदार आऊटफिट घातला होता. तिचा रेड कार्पेटवरील अंदाज सर्वांनाचं भूरळ घालणारा होता. (हेही वाचा - Rinku Rajguru Photoshoot On Ganesh Festival: रिंकू राजगुरुने ढोल, ताशाच्या गजरात केली गणपती बाप्पाची पूजा; पहा अभिनेत्रीचा मराठमोळा लूक, Watch Video)

दरम्यान, 'मिमी' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि याच कामगिरीसाठी सईने सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार जिंकला आहे. जो अभिनेत्रीने यापूर्वी आयफा पुरस्कारांमध्ये जिंकला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

यावेळी अभिनेत्रीने चमकदार पोशाख घातला होता. ज्यामुळे सईवर सर्वांच्याचं नजरा खिळत होत्या. आकर्षक पोशाख परिधान केलेल्या सईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर सईचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.