Readymix Official Teaser: वैभव तत्त्ववादी,प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी यांच्यातील लव्हट्रॅंगल 'रेडीमिक्स'च्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर!

'SOME CHOICES ARE DIFFICULT TO MAKE' असं म्हणत आला वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी च्या 'रेडीमिक्स' सिनेमाचा टीझर!

Readymix Teaser (Photo credits: Instagram )

Readymix Official Teaser: प्रार्थना बेहरे  (Prarthana Behere) आणि वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawaadi) या जोडीने नव्या वर्षातील त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. लव्हस्टोरी असली तरीही आगामी सिनेमा लव्ह ट्रॅंगल आहे. वैभव, प्रार्थना सोबत नेहा जोशी (Neha Joshi) 'रेडीमिक्स' (Readymix)  हा सिनेमा घेऊन येणार आहे. 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून 'SOME CHOICES ARE DIFFICULT TO MAKE' अशी या सिनेमाची टॅग लाईन असल्याने सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

कुणी लवकर करतं, कुणी उशिरा, कुणी थांबून राहतं.... प्रेमाचं टायमिंग 'रेडीमिक्स' असतं. Official Teaser रेडीमिक्स <3 8 FEB 2019 @vaibhav.tatwawaadi | @prarthana.behere | @joeneha SOME CHOICES ARE DIFFICULT TO MAKE Trailer on Youtube: http://bit.ly/ReadymixTeaser #Readymix | #8Feb2019 | Directed by Jalindar Kumbhar @ameyakhopkar #Prashant Ghaisas @sunilvasantbhosale #HasmukhHirani #SantoshNavle #AnilJadhav #AVKFilms #KrutiFilms #SomeelCreations

A post shared by Readymix Marathi Movie (@readymixfilm) on

' रेडीमिक्स' या आगामी मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. वैभव जोशी (समीर), प्रार्थना बेहरे (नुपूर) आणि नेहा जोशी (सानिका) अशी तीन विविध स्वभावातील पात्र साकारत आहेत.

आयुष्यात अगदी कपडी घेण्यापासून ते लाईफ पार्टनरची निवड करण्यापर्यंत सार्‍याच्याच बाबतीत हे तिघं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात. या सिनेमामध्ये आजच्या काळातील किचकट बनत चाललेली रिलेशनशिप्स आणि तरूणाई त्याकडे कशी बघतेय यावर भाष्य करण्यात आलं आहे. नायकाच्या रूपातील वैभव त्याच्या दोन लिडिंग लेडीजसोबत साकारत असलेल्या लव्हट्रॅंगलला रूपेरी पडद्यावर पाहण्याबाबत रसिकांच्या मनात नक्कीच उत्सुकता असेल.

रेडीमिक्स  या सिनेमाचं दिग्दर्शन जालिंधर कुंभार (Jalindar Kumbhar)यांनी केलं आहे. अमेय खोपकर यांनी कृती फिल्म्स आणि सोमिल क्रिएशन्स यांच्यासोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे. 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा रीलिज होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now