Pet Puraan Trailer: 'पेट पुराण' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, सई आणि ललित मुख्य भूमिकेत
नुकताच याचा ट्रेलर (Trailer) रिलीज करण्यात आला आहे.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) ही जोडी आता एका वेगळ्या आणि धमाल वेब सीरिजमधून (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. दोघांची नवी कोरी वेब सीरिज 'पेटपुराण' येत्या 6 मे पासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतेय. नुकताच याचा ट्रेलर (Trailer) रिलीज करण्यात आला आहे. लग्नानंतर नव्या जोडप्यांच्या मागे नातेवाईक पाळणा कधी हलणार म्हणून तगादा लावतात आणि त्या जोडप्याला नाना-प्रश्नांनी भांडावून सोडतात. 'पेट पुराण' ही वेब सीरिज आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राध्यानक्रमामधील संघर्षाना दाखवते.
या जोडप्याची मुले व कुटुंब नसण्याची इच्छा आहे आणि परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा अपारंपारिक व आगळावेगळा दृष्टीकोन आहे. हे जोडपं बाळाचे पालन-पोषण जमणार नाही म्हणून प्राणी पाळायचे ठरवतात आणि मग त्यांच्या आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात, याचे चित्रण या वेब सिरिजमध्ये करण्यात आले आहे. (हे देखील वाचा: प्रेक्षकांना पाहायला मिळणार राजकारणी आणि कलावंतिणीची प्रेमकाहाणी, चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित)
या सीरिजमध्ये अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर आणि अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. 'पेट पुराण'ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे आणि ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. पेट पुराण ही वेब सीरिज मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.