हॉट अभिनेत्री नेहा पेंडसे ने लग्नापूर्वी शेअर केला आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा 'Liplock Kiss'; फोटो ला दिले हटके कॅप्शन

या फोटोमध्ये नेहा आपल्या बॉयफ्रेंड कम तिचा होणारा नवरा शार्दुल सिंह याच्यासोबत रोमँटिक किस देताना दिसत आहे.

हॉट अभिनेत्री नेहा पेंडसे ने लग्नापूर्वी  शेअर केला आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा 'Liplock Kiss'; फोटो ला दिले हटके कॅप्शन
नेहा पेंडसे (Photo Credit: Instagram)

दाक्षिणात्य तसेच मराठी चित्रपटात स्वत: वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) 2020 मध्ये बोहल्यावर चढणार आहे अशा बातम्या आपल्या कानावर येत होत्या. मात्र नुकत्याच तिच्या इन्स्टाग्रामवरील फॅन क्लब पेजवर तिचे लग्नाआधीच्या पारंपारिक विधींचे फोटो पाहायला मिळाले. त्यामुळे ही गोष्ट तर पक्की झाली की नेहा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या घरी विवाहाची धामधूम सुरु झालेल्याचे फोटो असून त्यात ती तिच्या आईसोबत लग्नाआधीच्या ग्रहमुख विधी करताना दिसत होती. मात्र काही तासांपूर्वी नेहाने तिच्या अकाउंटवरून तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा लिपलॉक किसचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये नेहा आपल्या बॉयफ्रेंड कम तिचा होणारा नवरा शार्दुल सिंह (Shardul Singh) याच्यासोबत रोमँटिक किस देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Because it’s the last single girl kiss - Carrie Bradshaw

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

या फोटोला खाली नेहाने ' बॉयफ्रेंडसोबतचा बॅचलर मुलगी म्हणून शेवटचा किस' असे हटके कॅप्शन दिले आहे. ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नववर्षात अडकणार लग्नाच्या बेडीत; विवाहाआधीच्या पारंपारिक विधींचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

नेहा हिंदी बिग बॉस 12 ची स्पर्धक देखील राहिली होती. नेहा अनेक हिंदी , मराठी, दाक्षिणात्य चित्रपटात दिसली आहे. तसेच तिने मराठी अनेक आयटम साँगही केली आहेत.

मराठी चित्रपटातून IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना नेहा पेंडसे हिने "आपल्याला आपल्या स्वप्नातील राजकुमार मिळाला असून आपण एका नवीन कुटूंबात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे आपण खूप आनंदी आहोत असे सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2020 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).