Navratri 2020: नागरिकांना स्वच्छ श्वास देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलेच्या रुपातील देवीच्या 'या' अवताराचे तेजस्विनी पंडित ने घडवले दर्शन, See Pic
यात नागरिकांना स्वच्छ आणि मोकळा श्वास घेण्यासाठी रस्त्यावर उतरून कचरा गोळा करणा-या महापालिकेच्या सफाई कामगार महिलांचा सन्मान केला आहे.
महिलांमधील नवदुर्गेचा अवतार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने एक सुंदर असा उपक्रम राबविला आहे. यंदाचे हे वर्ष कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटाखाली आहे. अशा परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या परीने कार्यरत असलेल्या देवीच्या अवतारातील या महिलांचा सन्मान करण्यासाठी तेजस्विनी यंदा खास थीम ठेवली आहे. गेली 3 वर्ष तेजस्विनी नवरात्रीत (Navratri) हा विशेष उपक्रम करत आहे. आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस असून यासाठी तिने एक खास फोटो शेअर केला आहे.
यात नागरिकांना स्वच्छ आणि मोकळा श्वास घेण्यासाठी रस्त्यावर उतरून कचरा गोळा करणा-या महापालिकेच्या सफाई कामगार महिलांचा सन्मान केला आहे. या फोटोमध्ये तेजस्विनी रस्त्यावरील कचरा साफ करताना दिसत आहे. या पोस्टखाली 'मला ना lockdown ची सुट्टी, ना work from home ची मुभा तुझ्या स्वच्छ श्वासासाठी, देह हा माझा सदैव उभा, देह हा माझा सदैव उभा' असे कॅप्शन लिहिले आहे. हेदेखील वाचा- Navratri 2020: नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तेजस्विनी पंडित हिने साकारला पोलिसांच्या रुपातील दुर्गेचा अवतार! (See Pic)
याआधी तेजस्विनीने महिला डॉक्टर, महिला पोलिस यांच्यातील देवीचा अवतार चाहत्यांसमोर आणला होता. यंदाची तेजस्विनीची नवरात्री स्पेशल थीम लोकांना फार आवडत आहे. हा फोटो शेअर करताच काही मिनिटातच या फोटोला 20,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.