महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधवसह मराठी कलाकारांनी सोशल मिडियावर शेअर केले मराठमोळ्या अंदाजातील खास फोटोज, See Pics
Marathi Stars Look on Maharashtra Din 2021 (Photo Credits: Instagram)

आज संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din 2021) तसेच कामगार दिन साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्या हा उत्सव साजरा होत नसला तरी घरात राहून सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देऊन, आपले मराठी लूकमधील फोटोज शेअर करुन हा दिन साजरा करत आहेत. मग यामध्ये आपले मराठी कलाकार कसे बरे मागे राहतील. अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) आपला मराठमोळा लूकमधील फोटो शेअर करुन आपल्या सर्व चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा लूक पाहून अनेकांच्या नजरा खिळून राहतील.

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सुखदा खांडकेकर (Sukhda Khandkekar), उर्मिला कानेटकर (Urmila kanetkar) यांनी आपले मराठमोळ्या अंदाजातील फोटोज शेअर करुन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सोनाली कुलकर्णीचा पारंपारिक वेषातील, पारंपारिक अलंकार घातलेला लूक सोशल मिडियावर चर्चेत होता.हेदेखील वाचा- Maharashtra Din Wishes in Marathi: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा कामगार दिन!

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

त्याचबरोबर सिद्धार्थ जाधव याने फेटा घातलेला मराठ्यांचा लूक देखील चर्चेत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

उर्मिला कानेटकरचा बाईकवर नववारीतील लूक देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.