Holi 2021: मिताली-सिद्धार्थ चांदेकर, मानसी नाईकसह नुकत्याच लग्न झालेल्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, Watch Photos
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घरात एकमेकांना रंग लावून आपली लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली.
रंगपंचमीचा (Rangpanchami) उत्साह आज महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळाला नाही. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा सण साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लोकांना घरात राहूनच हा सण साजरा करावा लागत आहे. याचाच परिणाम नवीन लग्न झालेल्या मराठी कलाकारांनाही (Marathi Celebrities) आपली पहिली होळी घरातच साजरी करावी लागत आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये आणि यंदा 2021 मध्ये अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले. त्यांच्यासाठी यंदाची होळी ही लग्नानंतरची पहिली होळी होती. मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकर (Mitali Mayekar and Siddharth Chandekar), मानसी नाईक (Manasi Naik), सई लोकुर (Sai Lokur), शर्मिष्ठा राऊत (Sharmishta Raut) अशा अनेक कलाकारांना यंदा घरात राहून आपली पहिली रंगपंचमी साजरी केली.
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घरात एकमेकांना रंग लावून आपली लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली.हेदेखील वाचा- Riteish-Genelia Deshmukh यांनी आपल्या मुलांसमवेत घरात राहून हटके अंदाजात दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा, Watch Video
तर मानसी नाईक हिने देखील आपला पती प्रदिप खरेरा याच्यासोबत हरियाणवी रितीरिवाजाप्रमाणे रंगपंचमी साजरी केली.
सई लोकुरने देखील आपल्या पतीसोबत होळी साजरी केली.
या मराठी कलाकारांसोबत अभिज्ञा भावे, आस्ताद काळे, अक्षय वाघमारे या कलाकारांनी देखील आपल्या जोडीदारासोबत यंदाची आपली लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली.