Marathi Sexy Song: 'टकाटक' चित्रपटातील 'या' गाण्याने पार केल्या होत्या Boldness च्या सर्व सीमा; आतापर्यंत मिळाले तब्बल 11 मिलिअन पेक्षा जास्त व्ह्यूज

एकेकाळी बोल्ड (Bold), सेक्सी शॉट्स (Sexy Shots), किसिंग सिन्स (Kissing Scens) अशा गोष्टी टॅबू मानल्या जायच्या

Takatak Movie Song (Photo Credits: YouTube)

हल्ली मराठी चित्रपट कथा, पटकथा, मांडणी अशा अनेक बाबतीत कात टाकत आहे. एकेकाळी बोल्ड (Bold), सेक्सी शॉट्स (Sexy Shots), किसिंग सिन्स (Kissing Scens) अशा गोष्टी टॅबू मानल्या जायच्या मात्र आता याच गोष्टींनी अनेक चित्रपट भरलेले असलेले दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदार्षित झाला होता, तो म्हणजे टकाटक (TakaTak) या चित्रपटामधील 'ये चंद्राला' (Ye Chandrala) हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या गाण्यामध्ये अनेक बोल्ड शोट्स, किसिंग सिन्स व नग्नता होती. मात्र आता इतक्या कमी वेळेत या गाण्याला तब्बल 11 मिलिअन व्हूज मिळाले आहेत.

टकाटक हा चित्रपट एक सेक्स कॉमेडी असून, इंक डबल मिनिंगने भरलेले सिन्स यामध्ये आहेत. मराठी भाषेत घडलेला हा एक वेगळा प्रयत्न म्हणावा लागले. अशात यामधील 'ये चंद्राला' या गाण्याने तर बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. हे हॉट, बोल्ड असे रोमँटिक गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या गाण्यामध्ये अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांनी अभिनय केला आहे. गाण्याची सुरुवातच किसिंग शॉटने होते, त्यानंतर पलंगावर, शॉवर घेताना, बेडरूम मध्ये, पुढे बीचवर अनेक बोल्ड सिन्स यामध्ये आहेत.

ये चंद्राला गाणे -

हे गाणे श्रुती राणे (Shruti Rane) हिच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले असून वरुण लिखाते यांनी संगीत दिले आहे. मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील संवाद तर इतके बोल्ड आहेत की, ते तुम्ही एकट्यानेच ऐकलेले बरे. 28 जून 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यानंतर आतापर्यंत या गाण्याला 11 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.