'मोगरा फुलला’ सिनेमातील रोहित राऊतने गायलेले ‘मनमोहिनी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, १४ जूनला सिनेमा होणार प्रदर्शित

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार तदपूर्वी चित्रपटाच्या टीमतर्फे मनमोहिनी गाणं प्रदर्शत केले आहे, रोहित रौयतच्या आवाजातील या गाण्याने सध्या प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे असे म्हणता येईल

Mogra Phulala Poster (Photo Credits: File Photo)

Mogra Phulala Marathi Movie : स्वप्नील जोशी (Swapnil Joshi)  आणि सई देवधर (Sai Devdhar) यांचा आगामी चित्रपट ‘मोगरा फुलला’ (Mogra Phulala)  येत्या 14 जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुक्सना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटामध्ये नेमकं काय पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. यात भर करत चित्रपटाच्या टीम कडून 'मनमोहिनी' (Manmohini) हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा दिसून येतेय यामागचं महत्वाचं कारण म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत रोहित राऊत (Rohit Raut) ने या गाण्याला संगीतबद्ध करून गायले गेले आहे. या गाण्याची शब्दरचना अभिषेक कणखर यांची असून फुलवा खामकर (Phulwa Khamkar) यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.या गाण्याला सध्या प्रेक्षकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

(Watch Video)

मनमोहिनी हे रोमँटिक गाणं स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्यावर चित्रित केलेले असून सईचे हे मराठीतील पदार्पण असणार आहे. पहिलाच सिनेमा असूनही सई आणि स्वप्नीलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. 'मोगरा फुलला' मधील मनमोहिनी गाण्याच्या अनुभवाबद्दल रोहित राऊत सांगतो की, ‘मोगरा फुलला’ या एखाद गाणं संगीतकाराला सुचण्याआधी ते गाणं कोणत्या परिस्थितीला हवंय हे त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुचत आणि त्यानंतर संगीत दिग्दर्शक अचूक गाणं बनवतो, त्यातही संगीतबद्ध करण्यातील मजा काही औरच असून हे गाणं प्रत्येकाला स्वतःशी जोडलेलं वाटणार आहे, तुमच्या मनमोहिनीची आठवण करून देणारे हे गाणं आहे असे म्हणायला हरकत नाही.

'स्वप्निल जोशी' चा आगामी सिनेमा 'मोगरा फुलला' 14 जूनला होणार रीलिज

‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे . या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, यांच्या सोबत अनेक नवोदित चेहरे पाहायला मिळणार आहेत

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now