'हृदयात समथिंग समथिंग'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेते अशोक सराफ प्रथमच लव्ह गुरुच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'हृदयात समथिंग समथिंग' हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सिनेमात अभिनेते अशोक सराफ प्रथमच लव्ह गुरुच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक विनोद सिनेमा आहे. या सिनेमात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भूषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ हे कलाकार आहेत. तर सिनेमाची निर्मिती विनोदकुमार जैन यांनी केली असून प्रविण कार्ले यांनी दिग्दर्शनाची सुत्रं सांभाळली आहेत. हा सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचा अफलातून ट्रेलर....