'मी ब्राह्मण नाही...' असं म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे दिग्दर्शक सुजय डहाके यांना प्रत्युत्तर
फेसबुक पोस्ट करत तिने मी ब्राम्हण नसूनही माझ्याकडे काम आहे, असे म्हटले आहे.
सध्या मराठीत सुरु असलेल्या सर्व मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. इतर मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना का दिसत नाहीत? असा सवाल केसरी सिनेमाचे दिग्दर्शक सुजय डहाके (Sujay Dahake) यांनी लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला. तसंच यावेळी बोलताना सुजय यांनी विविध मालिकांची नावे घेत उदाहरणं दिली. यानंतर यावर अनेक प्रतिक्रीया येऊ लागल्या. यात आता मराठी मालिका आणि सिनेमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने देखील आपली प्रतिक्रीया फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नोंदवली आहे.
तेजश्रीने आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट शेअर करत सुजय डहाके यांच्या सवालाला उत्तर दिले आहे. या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिले की, "मी ब्राम्हण नाहीए बरं! CKP आहे.. पण काम आहे माझ्याकडे. आणि गेली 'य' वर्षं !! याला Talent म्हणूया का?" Babloo Bachelor सिनेमाच्या ट्रेलर मध्ये तेजश्री प्रधान हिचा बोल्ड किसिंग सीन; बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री (Watch Video)
तेजश्री प्रधान हिची पोस्ट:
एक व्हाईट कॉलर क्लास हे सर्व कंट्रोल करतो आणि आपल्याला वाटतं मराठी सिनेसृष्टीत सारं छान चाललंय, असंही सुजय डहाके म्हणाला. इतकंच नाही तर मला 23 व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा अनेकांना रागही असल्याचं त्याने यावेळी सांगितलं. केसरी या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत सुजय यांनी आपली भूमिका मांडली होती.
'सविता भाभी' हद्दपार, 'अश्लील उद्योग मित्र मंडळ' या चित्रपटाला कॉपीराईटचा फटका - Watch Video
सध्या तेजश्रीची 'अग्गंबाई सासुबाई' ही मालिका चांगलीच गाजत आहे. यापूर्वी तिच्या 'होणार सून मी या घरची' या मालिकेने लोकप्रियतेचा शिखर गाठला होता. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. त्यानंतर 'लेक लाडकी या घरची' या मालिकेतही तिची मुख्य भूमिका होती. मालिकांसोबतच तिने अनेक मराठी सिनेमातही काम केले आहे. तसंच लवकरच ती 'बबलू बॅचलर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.