अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने Coronavirus शी लढा देण्यासाठी आपल्या कवितेतून चाहत्यांना दिला मोलाचा संदेश

मुक्ता बर्वे ने नागरिकांनी कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे सांगत आपल्या देशावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी हिंमत देणारी एक सुंदर कविता सोशल मिडियावर शेअर केली आहे.

Mukta Barve (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्रातमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना व्हायरस हा विषाणू दिवसेंदिवस आपले जाळे महाराष्ट्रात पसरत चाललेले चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेकांना घरात राहणे पसंत केले आहे. गर्दी टाळा, हात स्वच्छ धुवा, संभाषण करताना एकमेकांमध्ये ठराविक अंतर ठेवा, खोकताना, शिंकताना नाकावर हात ठेवा असे अनेक सल्ले डॉक्टरांकडून दिले जात आहे. खबरदारी चे उपाय म्हणून सरकारकडून, प्रसारमाध्यमांकडून, सोशल मिडियावरुन सामाजिक संदेश दिले जात आहे. यात सर्व रुपेरी पडद्यावरचे कलाकारही एकवटले असून व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. यात मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve)हिने सोशल मिडियाच्या माध्यमातून कविता शेअर करुन आपल्या चाहत्यांना मोलाचा संदेश दिला आहे.

मुक्ता बर्वे ने नागरिकांनी कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे सांगत आपल्या देशावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी हिंमत देणारी एक सुंदर कविता सोशल मिडियावर शेअर केली आहे.

पाहा कविता:

 

View this post on Instagram

 

मी आणि माझ्या घरची मंडळी काळजी घेत आहोत, तुम्हीही स्वतः ची नीट काळजी घ्या. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच हे संकट लवकर दूर होईल. 😷🙏💪 #nocorona #besafe #becareful #beclean #corona #washyourhands #saveworld

A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

हेदेखील वाचा- Coronavirus: बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोना व्हायरसची लागण

"मी आणि माझ्या घरची मंडळी काळजी घेत आहोत, तुम्हीही स्वतः ची नीट काळजी घ्या. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच हे संकट लवकर दूर होईल" असे कॅप्शन मुक्ता बर्वे हिने या पोस्टखाली दिले आहे.

काजोल, नीना कुलकर्णी, श्रुती हसन यांच्यासह अशा एकूण 8 अभिनेत्रींसह मुक्ता बर्वे हिने 'देवी' या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. ही फिल्म प्रेक्षक खूप पसंत करत आहे.

25 सप्टेंबर 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या मुक्ता बर्वे हिने प्रमुख भूमिका साकारलेल्या 'जोगवा' या चित्रपटाने प्रेक्षकांची कौतुकाची थाप आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाने 2009 मध्ये तब्बल 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. राजीव पाटील (Rajiv Patil) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.