Manasi Naik Spinster Party: मानसी नाईक साठी तिच्या खास मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम ने केले स्पिनस्टर पार्टीचे आयोजन, Watch Video

मानसीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिपाली आणि सीमाने मानसीसाठी खास केक आणला आहे जो मानसी हातोडा घेऊन फोडत आहे. यात तिघींनी सारखे टी शर्ट आणि पँट घातली आहे.

Manasi Naik Spinster Party (Photo Credits: Instagram)

बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर अशी अनेक सुपरहिट गाणी देऊन घराघरात पोहोचलेली मानसी नाईक (Manasi Naik) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात ती आपला बॉयफ्रेंड इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीपशी (Pradeep Kharera) विवाह करणार आहेत. अलीकडेच तिचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्वांना तिचे लग्न कधी होणार उत्सुकता लागून राहिली होती. तसं मराठीतील या हॉट अभिनेत्रीचे लग्न होणार असल्याचे ऐकून अनेक तरुणांची मनं जरी दुखावली असली तरी मानसी सध्या प्रचंड खूश आहे. त्याचबरोबर तिच्या मैत्रिणीदेखील. त्यामुळे तिच्या लग्नाआधी तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी स्पिनस्टर पार्टीचे आयोजन केले होते. अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) आणि सीमा कदम (Seema Kadam) यांनी घरच्या घरी मानसीसाठी खास बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. मानसी नुकताच याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

मानसीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिपाली आणि सीमाने मानसीसाठी खास केक आणला आहे जो मानसी हातोडा घेऊन फोडत आहे. यात तिघींनी सारखे टी शर्ट आणि पँट घातली आहे.हेदेखील वाचा- Manasi Naik Engagement: मानसी नाईक होणार 'मिसेस खरेरा'; बॉक्सर, मॉडेल बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

पुण्यात 19 जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा 18 जानेवारीला होईल. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी 19 जानेवारीला होईल” अशी माहिती मानसीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसी नाईक आणि तिचा होणारा नवरा प्रदीप खरेरा हा लग्नसोहळा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लग्नात या दोघांच्या घरचे आणि जवळचे मित्र उपस्थित असतील असेही सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अनेक मराठी अभिनेत्रींच्या डोक्यावर अक्षता पडल्या. यात शर्मिष्ठा राऊत, सई लोकुर, अर्चना निपाणकर, कार्तिकी गायकवाड यांचा समावेश आहे. तर 2021 मध्ये देखील अनेक मराठी अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. त्यात मानसी नाईकसह सोनाली कुलकर्णी, मिताली मयेकर, अभिज्ञा भावे यांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now