Makeup Trailer: मेकअप चित्रपटाच्या ट्रेलर नंतर सलमान खान व अमिताभ बच्चन यांनी दिल्या रिंकू राजगुरू सहित टीम ला शुभेच्छा; पहा ट्विट

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सुद्धा रिंकू राजगुरू च्या मेकअप सिनेमाचा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Salman Khan And Amitabh Bachchan Wishes Rinku Rajguru For Makeup (Photo Credits: Instagram)

सैराट (Sairat) फेम 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही पुन्हा एकदा आपल्या रावडी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. नुकताच, तिच्या मेकअप (Makeup) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तूर्तास तरी यातील रिंकूच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दारूच्या नशेत झिंगलेल्या लग्नाळू मुलीचा साडी टू रावडी असा बदल सतत सिनेमात दिसून येणार आहे. या वेगळ्या लूक आउट मुळे प्रदर्शनाच्या आधीच सिनेमाची चर्चा आहे, आणि इतकी की थेट बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याने सुद्धा मेकअप चा ट्रेलर पाहून एक खास ट्विट केले आहे. सलमानने ट्विट करताना रिंकू सहित सिनेमाच्या टीमला खूप शुभेच्छा दिल्या आहेत तसेच हा ट्रेलर एकदा आवर्जून पहा असेही सांगितले आहे.याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांनी सुद्धा रिंकूच्या सिनेमाचा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

सलमान खान ट्विट

अमिताभ बच्चन  ट्विट

सैराट, कागर नंतर आता रिंकूचा तिसरा मराठी चित्रपट येत आहे. सैराट नंतर घरोघरीच नव्हे तर देशविदेशात पोहचलेल्या रिंकूने आपला एकदम केलेला कायापालट या सिनेमातून प्रकर्षाने दिसून येणार आहे. गणेश पंडित यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मेकअप या चित्रपटासाठी रिंकूने तब्बल 27 लाख मानधन घेतले आहे. हे मानधन कोणत्याही मराठी कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा सर्वात जास्त आहे.

पहा रिंकू राजगुरुच्या मेकअप चा ट्रेलर

दरम्यान, या चित्रपटात प्रथमच रिंकू आणि चिन्मय उदगीरकर ही जोडी पाहायला मिळणार आहे. 7 फेब्रुवारी पासून हा सिनेमा आपल्याला महाराष्ट्रात आपल्या जवळच्या सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.