महेश मांजरेकर यांनी कोविड योद्धांसाठी रचले 'We Can, We Shall' हे गाणे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकरसह अनेक मराठी कलाकारांचा सहभाग, Watch Video
या गाण्यात मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, सचिन खेडेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोनाविरुद्ध एक महायुद्ध सुरु आहे. हे महायुद्ध जिंकण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलिसांसारखे अन्य कोविड योद्धा अहोरात्र मेहनत घेत आहेत. असा बिकट परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलत अनेक कलाकार मंडळी गाण्यांमधून, डान्स मधून, संदेशामधून या कोविड योद्धांचे मनोबल वाढवत आहेत. त्यात आता दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी कोविड योद्धांसाठी खास गाणे तयार केले आहे. 'We Can We Shall Overcome' असे या गाण्याचे बोल आहेत.
या गाण्यात मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam), सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांसारख्या अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. Tu Chal Pudha Song: अत्यावश्यक सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मराठी कलाकारांचा मानाचा मुजरा; अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे अशा 32 लोकांनी एकत्र येऊन सादर केले 'तू चाल पुढं' गाणे (Video)
पाहा हे जबरदस्त गाणे:
या गाण्यामध्ये महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर सह संपूर्ण कुटूंब या गाण्यात दिसत आहेत. हे युद्ध आम्ही जिंकणारच असे या गाण्याचा अर्थ आहे.
महाराष्ट्रात काल 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर आदी ठिकाणं हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)