Luckee Poster: अभय महाजनच्या Nude Look मध्ये सिनेमाचं दुसरं पोस्टर, 16 जानेवारीला भेटीला येणार 'लकी' ट्रेलर!
7 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Luckee Poster: मराठी सिनेमाचा चेहरा मोहरा बदलणारा दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) लवकरच 'लकी' ( Luckee) हा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. बहुप्रतिक्षित या सिनेमाचं एक पोस्टर आणि गाणं रीलीज करण्यात आलं आहे मात्र सिनेमाचा ट्रेलर ( Luckee Trailer) अजून रसिकांसमोर आला नाही. 'लकी' सिनेमाचा ट्रेलर येत्या 16 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं आज सोशल मीडियाद्वारा सांगण्यात आलं आहे. यासोबतच सिनेमाचं एक नवं पोस्टरदेखील शेअर करण्यात आला आहे.
वेब सीरिजमधून रसिकांच्या भेटीला आलेला अभय महाजन पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमामध्ये दीप्ती सती या अभिनेत्रीसोबत तो झळकणार आहे. 'लकी' हा सिनेमा एक रोमान्स ड्रामा आहे. शेअर करण्यात आलेल्या दोन्ही पोस्टरमध्ये अभिनेता अभय महाजन न्यूड लूकमध्ये आहे.7 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी बप्पी लेहरी आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातील 'शोधू जरा कोपचा' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याद्वारा बप्पी लेहरी यांच्या आवाजाची जादू पहिल्यांदाच मराठीमध्ये ऐकायला मिळणार आहे.