लता मंगेशकर केवळ 'पार्श्वगायिका' नव्हे तर 'या' क्षेत्रातही मातब्बर आहेत !
'आनंदघन' या टोपणनावाने त्या संगीत देत असतं.
भारताची गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारतीय संगीत या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या होऊच शकत नाही. 8 दशकांहून अधिक काळ लता दीदींनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये पार्श्वगायन केलं आहे. लता मंगेशकरांच्या अवाजाची जादू आजही कायम आहे. यंदा लता दीदी वयाच्या नव्वदीमध्ये प्रवेश करणार आहेत.
लता दीदी आपल्या गायिका म्हणून परिचित असतील परंतू गायकापलिकलेडी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. लता मंगेशाकर गायिकेप्रमाणेच उत्तम संगीतकारही आहेत. त्यांनी मराठी सिनेमातील काही चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शकाची भूमिकाही पार पाडली आहे. 'आनंदघन' या नावाने लता मंगेशकर संगीत दिग्दर्शन करत असत.
कोणकोणत्या सिनेमांसाठी केले संगीत दिग्दर्शन ?
लता मंगेशकरांनी 1955 साली मराठी सिनेमा राम राम पाव्हणं या सिनेमाला पहिल्यांदा संगीत दिले. त्यानंतर मराठा तितुका मेळवावा (1963), मोहित्यांची मंजुळा (1963), साधी माणसं (1965 ) तांबडी माती (1969) या सिनेमांनाही लता मंगेशकरांनी संगीत दिले आहे.
साधी माणसं या सिनेमाच्या 'ऐरणीच्या देवा..' या गाण्यासाठी लता दीदींना महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
संगीत दिग्दर्शनासोबतच लता दीदींनी 4 सिनेमांची निर्मितीदेखील केली आहे. वादळ हा मराठी सिनेमा तर सी. रामचंद्रांसोबतचा झांझर, कांचन, आणि लेकिन या चित्रपटाची निर्मितीही लता दीदींनी केली.