Master Of Gharkaam: लॉकडाऊन मध्ये अभिनेता अमेय वाघने केला ‘मास्टर इन घरकाम’ कोर्स; व्हिडिओमधून देतोय झाडू, लादी अन् भांडी घासण्याचं प्रशिक्षण

लॉकडाऊन काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी विविध व्हिडिओ तयार करत आहेत. हे व्हिडिओ ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत आहेत. तसेच काहींनी वेळ घालवण्यासाठी विविध प्रकारचे कोर्स करण्यास सुरुवात केली आहे. मराठ मोळा अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) ने देखील आपल्या ट्विट अकाऊंटवरून एका कोर्सविषयी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

Amey Wagh | (Instagram)

Master Of Gharkaam: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी विविध व्हिडिओ तयार करत आहेत. हे व्हिडिओ ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत आहेत. तसेच काहींनी वेळ घालवण्यासाठी विविध प्रकारचे कोर्स करण्यास सुरुवात केली आहे. मराठ मोळा अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) ने देखील आपल्या ट्विट अकाऊंटवरून एका कोर्सविषयी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

‘मास्टर इन घरकाम’ (Master Of Gharkaam) असं या कोर्सचं नाव आहे. हा कोर्स करताना त्याला कोणत्या अडचणींना सामोर जावं लागलं, हे अमेयने या व्हिडिओमध्ये सांगितलंय. या व्हिडिओमधून अमेय चाहत्यांना झाडू, लादी अन् भांडी घासण्याचं प्रशिक्षण देत आहे. यात त्याने घरकाम कसं करायचं याविषयी सांगितलं आहे. (हेही वाचा - Madhuri Dixit’s Single Candle Out: कोविड 19 च्या गंभीर काळात अविरत कार्य करणाऱ्या Real Heroes साठी माधुरी दीक्षित हिने गायले खास गाणे (Watch Video))

दरम्यान, अमेयला या कोर्समध्ये ZLB हे तीन विषय शिकवण्यात आले. यातील Z म्हणजे झाडू मारणे, L म्हणजे लादी पुसणे, आणि B म्हणजे भांडी घासणे होय. या व्हिडिओमध्ये अमेयने झाडू, भांडी आणि लादी कशी पुसायची यासंदर्भात माहिती दिली आहे. अमेयचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युजर्संनी या व्हिडिओला लाईक तसेच मजेशीर कमेंन्टस् केल्या आहेत. (हेही वाचा - मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु च्या साडीतील अंदा पाहून चाहत्याने घातली लग्नाची मागणी; पहा व्हिडिओ)

लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प झाल्याने सिनेसृष्टीतल्या कलाकारांनी आपलं नवीन यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. अमेयने ‘वाघाचा स्वॅग’ या नावानं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. त्याच्या या चॅनेलला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमेयच्या या यूट्यूब चॅनेलला 12 हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळाले आहेत. अमेयने आज शेअर केलेल्या व्हिडिओला 5 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.