#पुन्हानिवडणूक- जाणून घ्या Sai Tamhankar, Siddharth Jadhav आणि इतर मराठी कलाकार का वापरात होते हा हॅशटॅग (Watch Video)
महाराष्ट्र राज्य राष्ट्रपती राजवटी खाली असतानाच मराठी कलाकार मात्र #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून ट्विट करत होते. काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे कलाकार सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी आणि सोनाली कुलकर्णी यांनी #पुन्हानिवडणूक या हॅशटॅग सोबत ट्विट केले होते. आणि त्यांच्या या ट्विट नंतर लगेचच नेटकऱ्यांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी ते भाजपसाठी काम करत असल्याचे आरोपही त्यांच्यावर केले. आणि म्हणूनच या सर्व कलाकारांनी पुन्हा एक ट्विट करत सर्वांची माफी मागितली व त्यांच्या #पुन्हानिवडणूक या हॅशटॅग वापरण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले.
पण नक्की #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरला तरी कशा करता? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर LatestLY मराठी च्या सूत्रांनी सांगितलेली माहिती अगदी तंतोतंत खरी ठरली आहे. कारण हा नवा हॅशटॅग म्हणजे या कलाकारंनी वापरलेली एक प्रोमोशनल स्ट्रॅटेजी होती.
सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी आणि सोनाली कुलकर्णी हे कलाकार एकत्र दिसणार आहेत मोठ्या पडद्यावर त्यांच्या आगामी 'धुरळा' या चित्रपटातून. यांच्यासोबत अमेय वाघ, प्रसाद ओक, उमेश कामात, अलका कुबल, प्रियदर्शन जाधव यांसारखे कलाकारही आपल्याला या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे संपूर्णपाने राजकीय पार्श्वभूमी असणारा हा नवा चित्रपट असणार आहे.
पाहा या चित्रपटाची पहिली झलक,
3 जानेवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे.
World Television Day 2019: मराठी भाषेतील काही चिरतरुण मालिका; अजूनही ताज्या आहेत त्या आठवणी
दरम्यान महाराष्ट्रात राज्यातील सत्तेचा संघर्ष मात्र अद्यापही संपलेला नाही. कोणताही पक्ष अजूनही सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाला नसल्याने ही राष्ट्रपती राजवट अजून किती काळ राज्यामध्ये असणार हे अजूनही सांगता येत नाही.