'फत्तेशिकस्त' सिनेमाचं पहिलं पोस्टर; उलगडणार शिवाजी महाराजांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची कहाणी
फर्जंद (Farzand) या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील दमदार यशानंतर आता सिनेमाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast) हा सिनेमा घेऊन घेणार आहे.
Fatteshikast Movie Poster: फर्जंद (Farzand) या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील दमदार यशानंतर आता सिनेमाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast) हा सिनेमा घेऊन घेणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पहिले पोस्टर रीलिज करण्यात आलं आहेत. शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवर या सिनेमाची कथा बेतली आहे.फत्तेशिकस्त या सिनेमाच्या पोस्टरवर शिवरायांच्या सर्जिकल स्ट्राईकची कहाणी असा उल्लेख करण्यात आला आहे. 'जय भवानी... जय शिवराय... जय जिजाऊसाहेब ... जय महाराष्ट्र... हरहर महादेव!' अशा मेसेज सह हे पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. Fatteshikast Poster: शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर; फत्तेशिकस्त 15 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमात हिंदी कलाकार अनुप सोनीदेखील दिसणार आहे.
फत्तेशिकस्त सिनेमाचं पोस्टर
1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत 'फत्तेशिकस्त' सिनेमाची पहिली झलक रसिकांसोबत शेअर करण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकरने यापूर्वी 'फर्जंद' हा सिनेमा साकारला होता. 'फर्जंद'लादेखील रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची कहाणी सिनेमातून रसिकांसमोर मांडण्यात आली होती. आता दिग्पाल पुन्हा 'फत्तेशिकस्त'च्या माध्यमातून ऐतिहासिक सिनेमाला हात घालणार आहे.